शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धा : भारताच्या खेळाडूंनी पटकावली तीन पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:33 IST

भारताचे झहीर पाशा, अनिल मुंडे, के. श्रीनिवास ठरले पदकांचे मानकरी

भारतीय आर्युविमा महामंडळ व ओ एन जी सी पुरस्कृत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या यजमान पदाखाली आयोजित करण्यात आलेल्या आठवा आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन  चषक स्पर्धेच्या ‘स्विज लीग’ पद्धतीच्या एकेरी गटात जहीर पाशा, अनिल मुंडे (भारत), के. श्रीनिवास (भारत) यांनी १६, १४, १४ असे गुण मिळवून सुवर्ण, रजत, कांस्य पदकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेला सोळा देशांतून शंभर खेळाडू आणि अधिकारी यांचा उस्फुर्त सहभाग लाभला आहे.

‘स्विज लीग’च्या आठव्या फेरीमध्ये भारताच्या जहीर पाशाने अत्यंत आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या इर्शाद एहमदचे २५-१० असा संघर्षपूर्ण विजय मिळवीत सुवर्ण पदक पटकावले. झहीर पाशाने आतापर्यंत पाच ब्रेक टू फिनीश नोंदविले आहे. भारताच्या अनिल मुंडेने सहज बांग्लादेशच्या रहमान हाफिजूरच्या २५-०८ असा पराभव करून वर्चस्व सिद्ध करत रजत पदक पटकाविले. भारताच्या के. श्रीनिवास ने २५-० असा विजय मिळवीत भारताच्या संदीप दिवेचा फडशा पाडून कांस्य पदक पटकावले.

आठव्या फेरीच्या सामन्यात भारताच्या रश्मी कुमारीने श्रीलंकेच्या दुलक्षने दिनेतचा २५-१३ असा विजय मिळवीत १२ वा क्रमांक पटकाविला. श्रीलंकेच्या माजी विश्‍व विजेता निशांत  फर्नांडोने यु.एस.ए. च्या मल्लीशेट्टी सॅम चा २५-१३ मात करत नववे क्रमांक पटकाविले. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताच्या राजेश गोईलने भारताच्या आएशा मोहंमदचा २५-०५ असा पराभव केला. भारताच्या काजल कुमारीने भारताच्याच अभिजीत त्रीपणकरचा २५-१५ असा पराभव करून पाचवे  क्रमांक पटकाविले. या स्पर्धेत आत्तापर्यंत नऊ ब्रेक टू फिनीश आणि पाच ब्लॅक टू फिनीश ची नोंद झालेली आहे.

महत्वपूर्ण निकालस्विस लीग  - प्रथम फेरीझहीर पाशा (भारत) वि. वि. इर्शाद एहमद (भारत)- २५-१०अनिल मुंडे (भारत) वि. वि. रहमान हाफिजूर (बांग्लादेश)- २५-०८के. श्रीनिवास (भारत) वि. वि. संदीप दिवे (भारत)- २५-०काजल कुमारी (भारत) वि. वि. अभिजित त्रिपणकर- २५-१५प्रशांत मोरे (भारत) वि. वि. महंमद अहमद मुल्ला (बांग्लादेश)- २५-०३राजेश गोईल (भारत) वि. वि. आएशा मोहंमद (भारत)- २५-०५निशांत फर्नांडो (श्रीलंका) वि. वि. मल्लीशेट्टी सॅम (यु.एस.ए)- २५-०८रश्मि कुमारी (भारत) वि. वि. दुलक्षणा दिनेत (श्रीलंका)- २५-१३  

टॅग्स :Indiaभारत