शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

आर्सेनालविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक

By admin | Updated: February 4, 2017 00:44 IST

प्रीमियर लीग स्पर्धेत यंदा फॉर्ममध्ये असलेल्या चेल्सीचा आगामी सामना तुल्यबळ आर्सेनालविरुध्द होणार आहे. विशेष म्हणजे चेल्सीचा स्टार खेळाडू नेमानजा मॅटिक

- नेमानजा मॅटिकशी बातचीत...प्रीमियर लीग स्पर्धेत यंदा फॉर्ममध्ये असलेल्या चेल्सीचा आगामी सामना तुल्यबळ आर्सेनालविरुध्द होणार आहे. विशेष म्हणजे चेल्सीचा स्टार खेळाडू नेमानजा मॅटिक या सामन्याकडे वचपा काढण्याच्या नजरेने पाहत असून यंदा सुरुवातीला झालेला आर्सेनालविरुध्दचा पराभव अजूनही चेल्सी खेळाडूंना झोंबत आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, त्या पराभवानंतर चेल्सीने केवळ एक पराभव पत्करताना स्पर्धेत थेट अव्वल स्थानी कब्जा केला. शिवाय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक असलेल्या मॅटिकसाठी तो सामना मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्याचवेळी २८ वर्षीय मॅटिक सध्या आपल्या नव्या स्थानी खेळताना शानदार कामगिरी करुन संघासाठी महत्त्वपुर्ण ठरत आहे. तसेच, आर्सेनालला नमवून कटू आठवणी मिटवण्यासाठी सध्या मॅटिकने कंबर कसली आहे...या सत्रात आर्सेनलकडून तुम्हाला ३ -० असा पराभव पत्करावा लागला. तो संघासाठी टर्निंग पॉईंट होता का, त्यानंतर नव्याने यंत्रणा लागू करण्यात आली. त्यामुळे तुमची कामगिरी सुधारली.हो, हे खरे आहे. तो आमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रसंग होता. मला आशा होती की तो प्रसंग आम्हाला जागे करणारा ठरेल. आणि तसेच झआले. त्यानंतर आम्ही सलग १३ सामने जिंकले. काही वेळा मोठे विजय मिळवण्यासाठी तुम्हाला पराभूत व्हावे लागते. मी खात्रीने सांगु शकतो की आम्ही पुन्हा अशा पद्धतीने पराभूत होऊ शकणार नाही. तुम्ही एखादा सामना गमवु शकता मात्र त्या पद्धतीने नाही.त्या दिवशी नेमक्या कोणत्या चुका झाल्या होत्या. आणि त्या एवढ्या महत्वाच्या होत्या.तुम्ही एखादी लढत गमावू शकता. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती तुम्ही कशा पद्धतीने त्यावर प्रतिक्रीया देता. आर्सेनल विरोधातील त्या सामन्यात आम्ही मैदानावर चांगल्या पद्धतीचा खेळ केला नाही. मी खात्रीने सांगु शकतो की शनिवारी नक्कीच एक वेगळी खेळी असेल. तुम्ही एका मोठ्या क्लबसाठी खेळताना अशा पद्धतीने पराभूत होता, तेव्हा ही गोष्ट स्विकारणे खूप कठीण असते. अमिरातीत झालेल्या पराभवाबद्दल तुझ्या आठवणी नेमक्या काय आहेत. हे खूप विचीत्र आहे. तुम्ही न लढता पराभूत झाला हे आमच्यासाठी खूप सोपे नाही. उदाहरणादाखल सांगु शकतो. आम्ही जानेवारीत टोटेनहॅमकडून पराभूत झालो. पण तुम्हाला जाणवेल की आमचा खेळ त्या दिवशी वेगळा होता. पण आर्सेनल विरोधातील सामन्यात ही बाब नव्हती. तो आमच्यासाठी वाईट दिवस होता. ते मात्र चांगले खेळले.यावेळी तुम्ही नक्कीच त्यांना पराभूत करण्यासाठी उत्सुक असाल. मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुकत असाल. ही तुमच्यासाठी संधी आहे. तुम्ही सर्वांना दाखवू शकता की तुम्ही का आला आहात, नाही का.नक्कीच, आम्ही पुढचा विचार करत आहोत. आमच्या खेळात योग्य त्या सुधारणा केल्या आहेत. आम्ही त्यांना दाखवु इच्छितो की, एक संघ म्हणून आम्ही कुठे आहोत आणि ते कुठे आहेत. आम्ही आमच्या घरच्या मैदानावर नक्कीच जिंकण्यासाठी प्रयत्न करू. त्यांच्याकडेही गुण आहे. ते संधी मिळवण्याच्या शोधातच असतील. पण मला खात्री आहे. आम्ही मानसिक आणि शारीरीक रुपाने तंदुरुस्त आहोत. मला खात्री आहे की, आमच्या संघाचे पाठिराखे खेळाचा नक्कीच आनंद घेतील.याच आठवड्यात आर्सेनलचा पराभव झाला. त्याने काय वाटले.नक्कीच, आर्सेनलच्या पराभवाने आम्हाला आनंद झाला. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला अपेक्षा नव्हती की यावेळी ते गुण गमावतील. पण ही प्रिमीयर लीग आहे. यात सर्व शक्य आहे. तुम्हाला तुमच्या खेळावर एकाग्र व्हावे लागेल.(पीएमजी)