शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

लाहोर आत, मुंबई बाहेर

By admin | Updated: September 17, 2014 02:09 IST

चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेतील मुंबई इंडियन्सचा प्रवास क्वालिफायर फेरीतच संपुष्टात आला.

रायपूर : चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेतील मुंबई इंडियन्सचा प्रवास क्वालिफायर फेरीतच संपुष्टात आला. लाहोर लायन्सने एक्स्प्रेसवर विजय साजरा करून इंडियन्सचा मुख्य फेरीतील  मार्ग अधिक खडतर बनवला होता. या आव्हानाचा सामना करण्याऐवजी इंडियन्स डगमगले आणि नॉर्दर्न डिस्ट्रिक्टविरुद्ध त्यांना सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवाने इंडियन्सला स्पध्रेतून गाशा गुंडाळायला लागला. आता मुख्य फेरीतील अखेरचे दोन संघ म्हणून नॉर्दर्न आणि लाहोर लायन्स यांनी एन्ट्री मिळवली आहे.
नाणोफेक जिंकून नॉर्दर्नने मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आपली गोलंदाजी भक्कम आणि अचूक आहे याची खात्री त्यांना असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. त्याला यश मिळवून दिले ते स्कॉट स्टायरिश आणि टीम साऊथी यांनी. या दोघांच्या भेदक मा:यासमोर इंडियन्सचे फलंदाज लडखडले. सलामीवीर लेंडल सिमन्स आणि मायकल हसी हे कोणताही करिष्मा न दाखवता माघारी परतले. चौथ्याच षटकात साऊथीने हसीला बाद करून इंडियन्सचे स्मीथ हिरावून घेतले. त्यानंतर इंडियन्सची पडझड सुरू झाली आणि त्यांचे 5 फलंदाज अवघ्या 46 धावांत माघारी परतले. स्टायरिशने पाचपैकी तीन फलंदाजांना बाद करून आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली. कर्णधार किरॉन पोलार्ड अखेरच्या षटकात फटकेबाजी करून संघाला मोठी धावसंख्या गाठून देईल, अशी आशाही फोल ठरली. त्याला 24 चेंडूंत 31 धावाच करता आल्या. त्यात दोन चौकार आणि एक षट्काराचा समावेश होता. हरभजन सिंगही स्वस्तात बाद झाल्याने मुंबई शंभरी पार करणार का? हा प्रश्न उपस्थित राहिला, पण o्रेयस गोपाल आणि लसिथ मलिंगा यांनी सहाव्या विकेटसाठी 29 धावा करून संघाला 132चा पल्ला गाठून दिला. 
मुंबईला कमी धावांत रोखून नॉर्दर्न  संघाने आपला विजय निश्चित केला आणि मुंबईला घरचा रस्ता दाखवला. तरीही विजय खेचून आणण्यासाठी मुंबईची धडपड सुरूच होती. सलामीवीर अॅन्टॉन देवसिच आणि केन विलियन्सन यांनी संघाला 83 धावांची दमदार भागीदारी करून दिली. हरभजन सिंगने दहाव्या षटकात देवसिच याला बाद केले खरे, परंतु तोर्पयत सामना हातातून निसटला होता. विलियन्सनने 36 चेंडूंत 7 चौकार व 1 षट्कार खेचत 53 धावा केल्या आणि नॉर्दर्न संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणून 
ठेवले. नॉर्दर्न संघाने ही लढत 17.2 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात जिंकून मुख्य फेरीत ऐटीत प्रवेश केला.
                          (वृत्तसंस्था) 
 
मुंबई इंडियन्स : सिमन्स त्रि. गो. स्टायरिश 13, हसी झे. कुग्गेलेंजीन गो. साऊथी 7, सक्सेना झे. विलियन्सन गो. स्टायरिश 1क्, रायडू झे. वॉटलिंग गो. बोल्ट 6, तरे झे. वॉटलिंग गो. स्टायरिश 7, पोलार्ड झे. हॅरिस गो. साऊथी 31, हरभजन झे. देवसिक गो. कुग्गेलेंजीन 1क्, गोपाल धावबाद (बोल्ट/वॉटलिंग) 24, मलिंगा त्रि. गो. साऊथी 2क्, ओझा नाबाद 1. अवांतर -3; एकूण - 9 बाद 132 धावा
गोलंदाजी - बोल्ट 4-क्-21-1, साऊथी 4-क्-14-3, कुग्गेलेजीन 4-क्-4क्-1, स्टायरिश 4-क्-21-3, सोधी 4-क्-25-क्.
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट : देवसिक झे. पोलार्ड गो. हरभजन 39, विलियन्सन झे. पोलार्ड गो. बुमराह 53, फ्लॅन झे. हरभजन गो. ओझा 13, वॉटलिंग झे. हरभजन गो. बुमराह क्, मिचेल नाबाद 16, स्टायरिश नाबाद 3. अवांतर - 9; एकूण 4 बाद 133 धावा
गोलंदाजी - मलिंगा 4-क्-31-क्, बुमराह 4-क्-26-2, हरभजन 4-क्-29-1, ओझा 3.2-क्-23-1, सक्सेना 2-क्-21-क्.