शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

भारताचा 'विराट' विजय, अश्विनची अष्टपैलू खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 04:07 IST

रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी आणि इतर गोलंदाजांकडून त्याला मिळालेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी विराट विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत
अँटिग्वा, दि. २५ : रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू खेळी आणि इतर गोलंदाजांकडून त्याला मिळालेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ९२ धावांनी विराट विजय मिळवला. त्याबरोबरच भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. दुसऱ्या डावात रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजची फलंदाजी ढेपाळली. भारताने फॉलोऑन दिल्यानंतर यजमान संघाने दुसऱ्या डावात ७८ षटकांत सर्वबाद २३१ धावा केल्या. या डावात आश्विनने सात बळी घेतले. ३३ सामन्यांत त्याने १७ वेळा ही कामगिरी केली. परदेशात ५ विकेट घेण्याची त्याची पहिली वेळ आहे. तर वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्यांदा ही कामगीरी केली आहे. 
 
पहिल्या डावांत भारताने विराट कोहलीचे द्विशतक आणि आश्विनचे शतक या जोरावर ५६६ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडीजचा पहिला डाव २४३ धावांतच आटोपला. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट याने चिवटपणे खेळ करीत ७४ धावा केल्या. सावधपणे खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या क्रेगने ७४ धावा करताना तब्बल २१८ चेंडू खेळले. मात्र, इतर फलंदाजांची त्याला साथ लाभली नाही. पहिल्या डावांत यष्टिरक्षक शेन डॉवरीच याने झुंजार खेळ केला. त्याने १०७ चेंडूंचा सामना करताना नाबाद ५७ धावा केल्या. डॉवरीचने फॉलोआॅन टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ते शक्य झाले नाही. भारताच्या शमी आणि यादव यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. अमित मिश्रानेदेखील दोन गडी बाद केले. 
 
विंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवातदेखील खराब राहिली. पहिल्या डावात एकही बळी न घेणाऱ्या ईशांत शर्मा याने पहिल्याच षटकात क्रेग ब्रेथवेटचा बळी घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडीजच्या १ बाद २१ धावा होत्या. चौथ्या दिवसाची सुरुवातही वेस्ट इंडीजसाठी खराब होती. पहिल्याच षटकात यादवने डॅरेन ब्रावोला १० धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर रविचंद्रन आश्विन नावाचे वादळ अ‍ॅँटिग्वाच्या खेळपट्टीवर पुन्हा घोंघावू लागले आणि त्याच्या फिरकीच्या जाळ््यात चंद्रिका, सॅम्युअल्स, चेस, ब्लॅकवूड आणि होल्डर हे एका पाठोपाठ एक अडकत गेले.
 
कसोटी सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करण्याची आश्विनची ही १७ वी वेळ आहे. त्याने ३३ कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली. सलामीवीर राजेंद्र चंद्रिका याने ३१ धावा केल्या, तर मार्लोन सॅम्युअल्स याने अर्धशतक झळकावले. ब्रेथवेटने तळाच्या फलंदाजाला सोबत घेऊन भारताचा विजय लांबणीवर टाकला त्याने नाबाद ५१ धावांची खेली केली. बिशूनेही ४५ धावांची खेळी करत भारताचा विजय लांबणीवर टाकला. पण अश्विनने भेदक मारा करत सामन्याच्या चौथ्याच दिवशी विजय मिळवून दिला.