शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतापुढे १७६ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: August 15, 2015 02:08 IST

दिनेश चंदीमलच्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ३६७ धावांची मजल मारली आणि भारतापुढे विजयासाठी १७६ धावांचे

गॉल : दिनेश चंदीमलच्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ३६७ धावांची मजल मारली आणि भारतापुढे विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर भारताने ८ षटकांत १ बाद २३ धावांची मजल मारली होती. भारताला विजयासाठी अद्याप १५३ धावांची गरज असून ९ विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्यावेळी सलामीवीर शिखर धवन (१३) याला नाईट वॉचमन ईशांत शर्मा (५) साथ देत होता. भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर लोकेश राहुल (५) बाद झाला असून त्याला रंगना हेराथने माघारी परतवले. चंदीमलने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना १६९ चेंडूंना सामोरे जात १९ चौकार व ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद १६२ धावा केल्या. त्याने लाहिरू थिरिमानेसोबत (४४) सहाव्या विकेटसाठी १२५ धावांची जेहान मुबारकसोबत (४९) सातव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. श्रीलंका संघाची दुसऱ्या डावात एकवेळ ५ बाद ९५ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी श्रीलंका संघावर डावाने पराभव स्वीकारण्याचे संकट घोंगावत होते. भारतातर्फे स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ११४ धावांच्या मोबदल्यात ४ तर अमित मिश्राने ६१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. हरभजनसिंग, ईशांत शर्मा व वरुण अ‍ॅरोन यांनी अनुक्रमे ७३, ७७ व ३९ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, पहिल्या डावात १९२ धावांनी पिछाडीवर पडलेल्या यजमान संघाची आज सुरुवातीला ५ बाद ९५ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर चांदीमल व थिरिमाने यांनी डाव सावरला. अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील संघाने आज दुसऱ्या सत्रात २८ षटकांमध्ये केवळ थिरिमानेची विकेट गमावताना १५५ धावा फटकावल्या. चांदीमल व थिरिमाने यांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. अश्विन व मिश्रा यांनी उपाहारानंतर ९ षटकांमध्ये ४८ धावा बहाल केल्या. डावाच्या ४० व्या षटकात चांदीमलने ४८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. चंदीलम व थिरिमाने यांनी ४७ व्या षटकात संघाला २०० चा पल्ला ओलांडून दिला आणि १२० चेंडूंमध्ये शतकी भागीदारी केली. या दोघांनी भारतीय फिरकीपटूंना कुठली संधी दिली नाही. ईशांत शर्मा आॅफ कलर दिसला. चहापानापूर्वी अश्विनने थिरिमानेला स्लिपमध्ये तैनात रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले आणि ही भागीदारी संपुष्टात आणली. थिरिमानेने ७६ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार ठोकले. चंदीलमने त्यानंतर मुबारकच्या साथीने धावसंख्या वाढविली. पहिल्या डावात भोपाळा फोडण्यात अपयशी ठरलेल्या मुबारकने मिश्राच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत खाते उघडले. त्यानंतर त्याने हरभजनच्या गोलंदाजीवरही षटकार ठोकले. मुबारकने ६९ व्या षटकात हरभजनच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करीत संघाला ३००चा पल्ला ओलांडून दिला. मुबारकने कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवल्यानंतर पुढच्याच चेंडूवर रहाणेकडे झेल देत माघारी परतला. त्याने ६० चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व २ षटकार ठोकले. त्यानंतर मिश्राने हेराथला (१) स्थिरावण्याची संधी दिली नाही. तो रहाणेकडे झेल देत माघारी परतला. रहाणेने या लढतीत आठवा झेल टिपताना विश्वविक्रम नोंदवला. चांदीलने थारिंडू कौशलच्या (०७) साथीने नवव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली, पण ईशांतने दुसऱ्या नव्या चेंडूवर कौशलला रिद्धिमान साहाकडे झेल देण्यास भाग पाडले आणि ही बहरत जाणारी भागीदारी संपुष्टात आणली. अश्विनने नुवान प्रदीपला (३) बोल्ड करीत श्रीलंकेचा डाव गुंडाळला. अश्विनने कारकिर्दीत तिसऱ्यांदा सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. सकाळच्या सत्रात संगकारा (४० धावा) आणि कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (३९ धावा) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जोडी माघारी परतल्यामुळे संघाचा डाव अडचणीत आला. (वृत्तसंस्था) नाईट वॉचमन धम्मिका प्रसाद (०३) याला अ‍ॅरोनने माघारी परतवले आणि श्रीलंका संघाची ३ बाद ५ अशी अवस्था केली. खराब पंचगिरीचा फटकाया लढतीत पंचांची कामगिरी निराशाजनक ठरली. अश्विनच्या गोलंदाजीवर चांदीमलच्या बॅटला लागून चेंडू हेल्मेटवर आदळला आणि उडालेला झेल बॅकवर्ड शॉर्टलेगला तैनात क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला, पण पंच ब्रुस आॅक्सेनफोर्ड यांनी त्याला नाबाद ठरविले. त्यावेळी चांदीमल केवळ पाच धावा काढून खेळत होता. त्यानंतर थिरिमानेने खातेही उघडले नसताना त्याच्या बॅट-पॅड झेल क्षेत्ररक्षकाने टिपला, पण पंच नाइजेल लाँग यांनी भारतीय संघाचे अपील फेटाळून लावले. ८ झेल टिपण्याचा रहाणेचा विश्वविक्रमभारताच्या अजिंक्य रहाणेने श्रीलंकेविरुद्ध गॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ८ झेल टिपण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला. रहाणेने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ५ झेल टिपण्याची कामगिरी केली. त्याने मिश्राच्या गोलंदाजीवर रंगना हेराथचा उडालेला झेल टिपताना हा विक्रम नोंदवला. रहाणेने आॅस्ट्रेलियाचा ग्रेग चॅपेल आणि मॅथ्यू हेडर, भारताचा यजुवेंद्र सिंग, श्रीलंकेचा हसन तिलकरत्ने आणि न्यूझीलंडचा स्टिफन फ्लेमिंग यांचा एका सामन्यात ७ झेल टिपण्याचा विश्वविक्रम मोडला. यजुवेंद्रने १९७७ मध्ये इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. यजुवेंद्रचा हा विक्रम ३८ वर्षांनंतर एका भारतीय खेळाडूने एका कसोटी सामन्यात सातपेक्षा अधिक झेल टिपत मोडला. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल टिपण्याचा विश्वविक्रम इंग्लंडचा यष्टिरक्षक जॅक रसेल व दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने प्रत्येकी ११ झेल टिपण्याचा पराक्रम केला आहे. पण, यष्टिरक्षकाचा अपवाद वगळता अन्य क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्याचा विक्रम आता अजिंक्य रहाणेच्या नावावर नोंदवला गेला आहे. रहाणेने पहिल्या डावात दिमुथ करुणारत्ने, लाहिरू थिरिमाने व दिनेश चांदीमल यांचे झेल टिपले होते. दुसऱ्या डावात त्याने धम्मिका प्रसाद, कुमार संगकारा, थिरिमाने, जेहान मुबारक आणि रंगना हेराथ यांचे झेल टिपताना विश्वविक्रम नोंदवला. धावफलकश्रलिंका पहिला डाव १८३. भारत पहिला डाव ३७५.श्रीलंका दुसरा डाव :- दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. अश्विन ००, कौशल सिल्वा त्रि. गो. मिश्रा ००, धम्मिका प्रसाद झे. रहाणे गो. अ‍ॅरोन ०३, कुमार संगकारा झे. रहाणे गो. अश्विन ४०, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज झे. राहुल गो. मिश्रा ३९, दिनेश चांदीमल नाबाद १६२, लाहिरू थिरिमाने झे. रहाणे गो. अश्विन ४४, जेहान मुबारक झे. रहाणे गो. हरभजन ४९, रंगना हेराथ झे. रहाणे गो. मिश्रा ०१, थारिंडू कौशल झे. साहा गो. ईशांत ०७, नुवान प्रदीप त्रि. गो. अश्विन ०३. अवांतर (१९). एकूण ८२.२ षटकांत सर्वबाद ३६९. गोलंदाजी : अश्विन २८.२-६-११४-४, मिश्रा १७-२-६१-३, हरभजन १७-०-७३-१, अ‍ॅरोन ७-०-३९-१, ईशांत १३-०-३९-१. भारत दुसरा डाव :- लोकेश राहुल पायचित गो. हेराथ ०५, शिखर धवन खेळत आहे १३, ईशांत शर्मा खेळत आहे ०५. अवांतर (०). एकूण ८ षटकांत १ बाद २३. गोलंदाजी : धम्मिका प्रसाद २-१-२-०, रंगना हेराथ ३-०-१३-१, थारिंडू कौशल ३-१-८-०.