शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारताची मालिकेत विजयी आघाडी, युवराज- धोनी तळपले

By admin | Updated: January 20, 2017 07:41 IST

दुसऱ्या वन-डे लढतीत इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मलिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

कटक : युवराज सिंग व महेंद्रसिंग धोनी यांनी केलेल्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने बाराबती स्टेडियममध्ये गुरुवारी अखेरपर्यंत रंगतदार ठरलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीत इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मलिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनची शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. भारताने ६ बाद ३८१ धावांची दमदार मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ८ बाद ३६६ धावांत रोखला गेल्या. जेसन रायने (८२) संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने जो रुटसोबत (५४) दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. कर्णधार मॉर्गनने सूर गवसल्याचे संकेत देताना ८१ चेंडूंमध्ये १०२ धावांची खेळी केली. त्याने मोईन अलीसोबत (५५) सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची तर लियाम प्लंकेटसोबत (नाबाद २६) चार षटकांत ५० धावांची भागीदारी केली. पण त्याचे हे प्रयत्न संघाचा पराभव टाळण्यात अपुरेच पडले. इंग्लंडला अखेरच्या ८ षटकांत १०५ धावांची गरज होती. मॉर्गनने इंग्लंडच्या आशा कायम राखल्या होत्या. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी २२ धावांची गरज असताना मॉर्गन तंबूत परतला होता. बुम्राने त्याला चतुराईने धावबाद करुन भारतीयांचे टेन्शन कमी केले. इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी २२ धावा असताना भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करताना केवळ ६ धावा दिल्या, अन भारताने जल्लोष केला. फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांमध्ये रवींद्र जडेजाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने १० षटकांत ४५ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. रविचंद्रन अश्विन सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६५ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. इंग्लंडला वर्तमान भारत दौऱ्यात अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. यापूर्वी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांना ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. उभय संघांदरम्यान तिसरा व अखेरचा वन-डे सामना २२ जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर खेळला जाणार आहे. युवराज सिंग व महेंद्रसिंग धोनी यांचा बाराबती स्टेडियममध्ये गुरुवारी जुना जोश अनुभवायला मिळाला. युवराज व धोनी यांनी झळकविलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे लढतीत ६ बाद ३८१ धावांची मजल मारली. भारताची ३ बाद २५ अशी नाजूक अवस्था असताना या दोघांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी २५६ धावांची भागीदारी केली. जवळजवळ तीन वर्षांनंतर वन-डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत असलेला डावखुऱ्या युवराजने कारकिर्दीतील १४ वे आणि इंग्लंडविरुद्ध चौथे शतक झळकावले. युवराजने यापूर्वीची अखेरची शतकी खेळी २०११ विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर भारताची सुरुवात निराशाजनक झाली. पाचव्या षटकात के.एल. राहुल (५), शिखर धवन (११) व फॉर्मात असलेला कर्णधार कोहली (५) यांना गमावले होते. या तिघांना व्होक्सने तंबूचा मार्ग दाखवला. गेल्या लढतीत विजयाचा शिल्पकार ठरलेल्या केदार जाधवने १० चेंडूंना सामोरे जाताना २२ धावा केल्या तर हार्दिक पांड्याने ९ चेंडूंमध्ये नाबाद १९ धावांचे योगदान दिले. रवींद्र जडेजाने ८ चेंडूंमध्ये नाबाद १८ धावा फटकावल्या. (वृत्तसंस्था)>युवराजने १५० धावांची शानदार खेळी केली. त्याची ही कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली. धोनीने सुरुवातीला सहकाऱ्याची भूमिका बजावली आणि त्यानंतर आपला पूर्वीचा जलवा दाखविला. त्याने १३४ धावांची खेळी केली. भारताची सुरुवातीला ३ बाद २५ अशी अवस्था झाली असताना, युवराज व धोनी यांनी चौथ्या विकेटसाठी २५६ धावांची भागीदारी करीत डाव सावरला.>युवराजची शतकी खेळी इंग्लंडचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ख्रिस व्होक्सने (४-४६) संपुष्टात आणली. युवराजने १२७ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकार व ३ षटकार लगावले. या खेळीदरम्यान युवराज भारतातर्फे इंग्लंडविरुद्ध वन-डेमध्ये सर्वाधिक धावा (१४७८) फटकावणारा फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकरचा (१४५५) विक्रम मोडला. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच शतकी खेळी केली. हे त्याचे कारकिर्दीतील दहावे शतक आहे. त्याने १२२ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व ६ षटकार लगावले. या खेळीदरम्यान तो वन-डेमध्ये २०० पेक्षा अधिक षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला. धोनीने आजच्या खेळीत भारतात ४००० वन डे धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा सचिन पाठोपाठ (६९७६ धावा) तो दुसरा फलंदाज आहे.>धावफलकभारत : लोकेश राहुल झे. स्टोक्स गो. व्होक्स ५, शिखर धवन त्रि.गो. व्होक्स ११, विराट कोहली झे. स्टोक्स गो. व्होक्स ८, युवराज सिंग झे. बटलर गो. व्होक्स १५०, महेंद्रसिंग धोनी झे. विली गो. प्लंकेट १३४, केदार जाधव झे. बॉल गो. प्लंकेट २२, हार्दिक पांड्या नाबाद १९, रवींद्र जडेजा नाबाद १६, अवांतर १६. एकूण : ५० षटकांत ६ बाद ३८१ धावा. गडी बाद क्रम : १/१४, २/२२, ३/३५, ४-२८१, ५-३२३, ६-३५८. गोलंदाजी : व्होक्स १०-३-६०-४, विली ५-०-३२-०, बॉल १०-०-८०-०, प्लंकेट १०-१-९१-२, स्टोक्स ९-०-७९-०, अली ६-०-३३-०.इंग्लंड : जेसन रॉय त्रि. जडेजा ८२, अ‍ॅलेक्स हेल्स झे. धोनी गो. बुम्राह १४, रूट झे. कोहली गो. अश्विन ५४, मॉर्गन धावचित १०२, बेन स्टोक्स त्रि. अश्विन १, बटलर यष्टीचित धोनी गो. अश्विन १०, मोईन अली त्रि. भुवनेश्वर कुमार ५५, ख्रिस वोक्स त्रि. बुम्राह ५, प्लुम्केट नाबाद २६, विली नाबाद २६. अवांतर : ५ एकुण : ५० षटकांत ८ बाद ३६६. गडी बाद क्रम : १/२८, २-१२८, ३/१७०, ४/१७३, ५/२०६, ६/२९९, ७/३०४, ८/३५४. गोलंदाजी : भुवनेश्वर १०-१-८३-१, बुम्राह ९-०-८१-२, जडेजा १०-०-४५-१, हार्दिक पंड्या ६-०-६०-०, अश्विन १०-०-६५-३, केदार जाधव ५-०-४५-०.