शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल प्रेमींसाठी खुशखबर! आशियाई स्पर्धेच्या मैदानात 'भारत', क्रीडा मंत्रालयाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 19:39 IST

India National Football Team : आगामी आशियाई स्पर्धेत भारताचा पुरूष आणि महिला फुटबॉल संघ खेळताना दिसणार आहे.

Asian Games 2023 : आगामी आशियाई स्पर्धेत भारताचा पुरूष आणि महिला फुटबॉल संघ खेळताना दिसणार आहे. चीनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने परवानगी दिली आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली असून भारतातील फुटबॉल प्रेमींना एक खुशखबर मिळाली आहे. कारण क्रीडा मंत्रालयाच्या नियमांनुसार भारताचे पुरुष आणि महिला फुटबॉल संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकले नव्हते.

दरम्यान, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिमॅक यांनी काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून आगामी आशियाई  स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी मागितली होती. खरं तर फिफाच्या आशियाई फुटबॉल क्रमवारीत भारताच्या संघांचा टॉप-८ मध्ये देखील समावेश नाही. पण, मागील काही कालावधीपासून भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी सुधारत चालली असून हे पाहता क्रीडा मंत्रालयाने विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

 भारतीय संघ आशियाई स्पर्धा गाजवण्यासाठी सज्जकेंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटच्या माध्यमातून भारतीय फुटबॉल प्रेमींना खुशखबर दिली. ठाकूर यांनी ट्विट करत म्हटले, "भारतातील फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची बातमी असून आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले पुरूष आणि महिला हे दोन्हीही संघ खेळताना दिसणार आहेत. भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाने दोन्ही संघांच्या सहभागाबाबत नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काळातील त्यांची प्रभावी कामगिरी पाहता मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मला आशा आहे की, आता हे संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करतील."

सैफ चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंकाअलीकडेच पार पडलेल्या सैफ चॅम्पियनशिपचा किताब पटकावण्यात भारतीय संघाला यश आले. सैफ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कुवेत संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत भारतीय शिलेदारांनी स्पर्धेचा किताब उंचावला. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघ आशियाई स्पर्धा गाजवणार का हे पाहण्याजोगे असेल. आता पुन्हा एकदा आशियाई क्रीडा स्पर्धेत तमाम भारतीयांच्या नजरा कर्णधार सुनील छेत्रीच्या संघावर असतील.

टॅग्स :FootballफुटबॉलAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Anurag Thakurअनुराग ठाकुरSunil Chhetriसुनील छेत्री