शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

भारताची पकड मजबूत

By admin | Updated: August 14, 2015 02:58 IST

सलामीवीर शिखर धवन व कर्णधार विराट कोहली यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात १९२ धावांची भक्कम आघाडी मिळविणाऱ्या भारतीय संघाने आज दुसऱ्या

गॅले : सलामीवीर शिखर धवन व कर्णधार विराट कोहली यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात १९२ धावांची भक्कम आघाडी मिळविणाऱ्या भारतीय संघाने आज दुसऱ्या दिवशी श्रीलंकेची दुसऱ्या डावात २ बाद ५ अशी अवस्था केली आणि पहिल्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली. भारताचा पहिला डाव आज दुसऱ्या दिवशी ३७५ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंका संघाच्या दोन फलंदाजांना माघारी परतवले. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला त्या वेळी श्रीलंकेची दुसऱ्या डावात २ बाद ५ धावा अशी अवस्था झाली होती. श्रीलंकेला डावाने पराभव टाळण्यासाठी अद्याप १८७ धावांची गरज असून, त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. धवनने कारकिर्दीतील चौथे शतक झळकावताना १३४ धावांची खेळी केली. त्याने २७१ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार लगावले. कर्णधार कोहलीने १०३ धावा फटाकवल्या. त्यात ११ चौकारांचा समावेश आहे. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २२७ धावांची भागीदारी केली. यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने ६० धावा फटकावल्या. साहाच्या कसोटी कारकिर्दीतीले हे पहिले अर्धशतक आहे. श्रीलंकेतर्फे आॅफ स्पिनर तारिंदू कौशलने १३४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर मध्यमगती गोलंदाज नुवान प्रदीने ९८ धावांत तीन फलंदाजांना माघारी परतवले. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी श्रीलंकेच्या तंबूत चिंता निर्माण केली. कोहलीने पहिल्या डावात ६ बळी घेणाऱ्या आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनकडे नवा चेंडू सोपवला. पहिल्याच षटकात वेगाने वळणाऱ्या चेंडूवर दिमुथ करुणारत्ने क्लिनबोल्ड झाला. लेगस्पिनर अमित मिश्राने दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करताना गुगलीवर दुसरा सलामीवीर कौशल सिल्वाला तंबूचा मार्ग दाखवला. श्रीलंका संघाची भिस्त आता अखेरची कसोटी मालिका खेळणाऱ्या कुमार संगकाराच्या कामगिरीवर अवलंबून आहे. आजचा खेळ थांबला त्या वेळी १ धाव काढून खेळपट्टीवर असलेल्या संगकाराला नाईट वॉचमन धम्मिका प्रसाद ३ धावा काढून साथ देत होता.  कालच्या २ बाद १२८ धावसंख्येवरून पुढे खेळताना धवन व कोहली यांनी आज पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविले. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचे वर्तवलेले भाकीत चुकीचे ठरल्याचा या दोन्ही फलंदाजांनी चांगला लाभ घेतला. कालच्या तुलनेत आज सकाळच्या सत्रात खेळपट्टीचे स्वरूप बदललेले भासत होते. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे चित्र होते. धवनने सहकारी कोहलीच्या तुलनेत आक्रमक फलंदाजी केली. वैयक्तिक ७९ धावांवर असताना धवन सुदैवी ठरला. कौशलच्या गोलंदाजीवर त्याच्याविरुद्ध पायचितचे अपील पंचांनी फेटाळून लावले, त्या वेळी चेंडू मधल्या यष्टिवर आदळत असल्याचे दिसत होते; पण पंच ब्रुस ओक्सेनफोर्ड यांनी त्याला नाबाद ठरविले. धवनने डावाच्या ५३व्या षटकात कौशलच्या गोलंदाजीवर दोन चौकार ठोकले आणि भारताने श्रीलंकेची पहिल्या डावातील धावसंख्या ओलांडली. धवनचे कसोटी क्रिकेटमधील हे सलग दुसरे शतक ठरले. त्याने जून महिन्यात बांगलादेशाविरुद्ध फतुल्लाह कसोटीमध्ये १७३ धावांची खेळी केली होती. त्याने उपखंडात कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा शतकी खेळी केली. धवनने भारत (१८७), न्यूझीलंड (११५) आणि बांगलादेश (१७३) यानंतर श्रीलंकेतही पहिले शतक झळकावले. उपाहाराला खेळ थांबला, त्या वेळी भारताने २ बाद २२७ धावा अशी मजल मारली होती. आज दुसऱ्या सत्रात भारताने ७७ धावांच्या अंतरात कोहली, अजिंक्य रहाणे (०), धवन आणि आश्विन (७) यांच्या विकेट गमावल्या.

कोहली कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा १०३ धावा काढून बाद झाला. रहाणे खाते उघडण्यापूर्वीच माघारी परतला. साहने सावध फलंदाजी केली. श्रीलंकेने ८६ व्या षटकात नवा चेंडू घेण्याचा निर्णय घेतला. त्याला लवकरच लाभ मिळाला.प्रदीपच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू धवनच्या बॅटला लागून यष्टीवर आदळला. प्रदीपने पुढच्या षटकात आश्विनला माघारी परतवले. कौशलने तिसऱ्या सत्रात सुरुवातीला हरभजनसिंग (१४) आणि अमित मिश्रा (१०) यांना बाद केले. साहने प्रदीपच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करीत कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. साहने प्रदीपच्या गोलंदाजीवर षटकारही ठोकला, पण याच गोलंदाजाविरुद्ध हुकचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याला झेलबाद देण्यात आले.रिप्लेमध्ये चेंडू हेल्मेटला लागून दिनेश चांदीमलकडे गेल्याचे स्पष्ट झाले. कौशलने वरुण अ‍ॅरोनला (४) बाद करीत आपला पाचवा बळी घेतला आणि भारताचा डाव गुंडाळला. ३९ चेंडू खेळणारा ईशांत शर्मा ३ धावा काढून नाबाद राहिला.

धावफलकभारत पहिला डाव : लोकेश राहुल पायचीत गो. प्रसाद ७, शिखर धवन त्रि. गो. प्रदीप १३४, रोहित शर्मा पायचीत गो. मॅथ्यूज ९, विराट पायचीत गो. कौशल १०३, अजिंक्य रहाणे पायचीत गो. कौशल ००, रिद्धिमान साह झे. चांदीमल गो. प्र्रदीप ६०, आर. आश्विन त्रि. गो. प्रदीप ७, हरभजनसिंग त्रि. गो. कौशल १४, अमित मिश्रा त्रि. गो. कौशल १०, ईशांत शर्मा नाबाद ३, वरुण अ‍ॅरोन झे. मॅथ्यूज गो. कौशल ४, अवांतर : २४, गडी बाद क्रम : १/१४, २/२८, ३/२५५, ४/२५७, ५/२९४, ६/३०२, ७/३३०, ८/३४४, ९/३६६, १०/३७५. गोलंदाजी : प्रसाद २२-४-५४-१, प्रदीप २६-२-९८-३, मॅथ्यूज ४-१-१२-१, कौशल ३२-४-२-१३४-५, हेराथ ३३-४-६७-०. श्रीलंका दुसरा डाव : दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. आश्विन ००, कौशल सिल्व्हा त्रि. गो. मिश्रा ००, धम्मिका प्रसाद खेळत आहे ३, कुमार संगकारा खेळत आहे १, अवांतर : १, एकूण : ४ षटकांत दोन बाद ५ धावा. गडी बाद क्रम : १/०, २/१. गोलंदाजी : आश्विन २-२-०-१, मिश्रा १-०-१-०, हरभजन १-०-४-०.