‘रीओ’चे तिकीट पक्के : हॉकी लढतीत भारताकडून पाकिस्तान पेनेल्टी शूटआउटमध्ये पराभूत; महिला रिले संघ चॅम्पियन
इंचियोन : भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणतीच चूक न करता रिओ ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. सरदार सिंह याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
या विजयाबरोबर सुवर्णपदकासह ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवत एका दगडात दोन लक्ष्य गाठली. 16 वर्षानंतर भारताने आशियाई स्पध्रेचे सुवर्णपदक पटकावले.
साखळी सामन्यात भारताला पाककडून पराभव पत्करावा लागला होता. अंतिम लढतीत हेच प्रतिस्पर्धी आमने-सामने आल्याने सामना हाय व्होल्टेज होईल हे निश्चित होते. सामन्याच्या सुरुवातीपासून त्याची प्रचिती पाहायला मिळाली. पाकिस्तानी समर्थकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर भारताने स्वत:वर कोणतेही दडपण येऊ दिले नाही. सुरुवातीला आक्रमक वाटणा:या पाकला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. सामन्याच्या तिस:याच मिनिटाला रिजवानने गोल करून पाकला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, परंतु पाक गोली बट याने त्या चोखपणो परतवल्या. दुस:या क्वार्टरमध्ये भारताचा गोली पी.आर. o्रीजेश याने पाकचे दोन वार परतवले आणि भारतीय चमूला बुस्ट मिळाला. 27व्या मिनिटाला कोथाजीत सिंहने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. कोथाजीतच्या या गोलने स्टेडियमवर उपस्थित मोजक्याच भारतीय प्रेक्षकांमध्ये चैतन्य संचारले. तिस:या आणि चौथ्या क्वार्टर्समध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करून सामन्यातील उत्सुकता शिगेला पोहोचवली.
पहिला धक्का
पाकचा अब्दुल खान हा आत्मविश्वासाने आला, परंतु भारताचा गोली o्रीजेश याची भिंत त्याला भेदता आली नाही. o्रीजेशच्या या बचावाने पाक बॅकफुटवर गेले आणि भारताला आघाडी घेण्याची संधी मिळाली. रुपींदरने दुसरी पेनल्टी यशस्वी करून पाकला एक धक्का दिला. पाकवरील दडपण वाढत होते.
गोल ग्राहय़ नाही..
मोहम्मद उमर हा त्याच दडपणाखाली आला आणि त्यालाही गोल करण्यापासून o्रीजेशने रोखून 2-क् अशी आघाडी घेतली. तिस:या प्रयत्नात त्यांना मोहम्मद वकास याने पहिला गोल करून दिला आणि सामना 2-1 असा बरोबरीवर आला. त्याच क्षणी भारताकडून तिस:या प्रयत्नात मनप्रीत सिंह याने चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला खरा, परंतु तो गोल ग्राह्य न धरल्याने सामन्यातील चुरस वाढली.
दुष्काळ संपवला
o्रीजेशने पाकच्या मोहम्मद हसीम खान व मोहम्मग भुट्टा यांचे हल्ले परतवून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. फ्रंटसिटवर बसलेल्या भारताला बीरेंद्र लाकडा व धरमवीर सिंग यांनी आघाडी मिळवून देत सामन्यात 4-2 असा विजय मिळवला आणि 16 वर्षाचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला.
तायक्वांदो : भारतीय तायक्वांदोपटूंची कामगिरी निराशाजनक ठरली. महिला व पुरुष विभागामध्ये भारतीय खेळाडूंना पदक पटकाविता आले नाही.
व्हॉलिबॉल :व्हॉलिबॉल स्पर्धेत पुरुष संघाला पाचव्या ते आठव्या स्थानासाठी झालेल्या क्लासिफिकेशन सामन्यात थायलंडविरुद्ध 3-1 ने पराभव स्वीकारावा लागला. हाँगकाँगविरुद्ध 3-क् ने पराभव स्वीकारणा:या महिला संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
टेबल टेनिस : टेबल टेनिस स्पर्धेत सौम्यजित घोष व मनिका बत्र यांना आपापल्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सौम्यजित व मनिका यांचे आव्हान संपुष्टात आले.
बॉक्सिंगमध्ये भारताला पाच पदके
भारतीय बॉक्सर्सनी आशियाई स्पर्धेत पाच पदकांची कमाई केली. विकास कृष्णन व सतीश कुमार यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. ग्वांग्झू आशियाई स्पर्धेच्या तुलनेत यावेळी बॉक्सिंगमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. ग्वांग्झूमध्ये भारताने दोन सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदके पटकाविली होती. त्यात तीन रौप्य व चार कांस्यपदकांचा समावेश होता. या वेळी केवळ एम. सी. मेरीकोमला सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर सरिता देवी, पूजा राणी, विकास व सतीश कांस्यपदकाचे मानकरी ठरले.
महिला रिले स्पर्धेत भारताचे वर्चस्व
अॅथलेटिक्समध्ये भारतीय महिला संघाने 4 बाद 4क्क् मीटर रिले स्पर्धेत वर्चस्व कायम राखताना आशियाई स्पर्धेत विक्रम नोंदविला. भारताने या स्पर्धेत सलग चौथ्यांदा सुवर्णपदकाचा मान मिळविला.
प्रियंका पवार, टिंटू लुका, मनदीप कौर व एम. आर. पूवम्मा यांचा समावेश असलेल्या रिले संघाने 3:28.68 सेकंदाचा वेळ नोंदवित सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी आशियाई स्पर्धेतील विक्रम 3:29.क्2 सेकंद वेळेचा होता. भारताने 2क्1क् मध्ये विक्रम नोंदविला होता.
भारतीय महिला संघाने चार बाय चारशे रिलेचे सुवर्णपदक 2क्क्2, 2क्क्6, 2क्1क्, 2क्14 सलग चौथ्यांदा जिंकले आहे.
विजयाचे श्रेय श्रीजेशला
हा विजय आमच्यासाठी ऐतिहासिकच म्हणावा लागेल. या सुवर्णपदकासाठी आम्ही अथक प्रय} केले होते. पेनल्टीशूटआऊटमध्ये लढत गेल्यावर आमच्यावर दडपण जाणवले, परंतु o्रीजेशच्या अप्रतिम बचावाने विजय साकारला.
- सरदार सिंह, कर्णधार
इंद्रजीतला कांस्य
पुरुषांच्या गोळा फेक प्रकारात इंद्रजीतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने आपल्या पहिल्या संधीत 17.19 मी. गोळा टाकला. दुस:या व तिस:या संधीला त्याने 18.52 अंतर पार केले. चौथ्या संधीत त्याने 18.14 मी. गोळा टाकला. इंद्रजीतने आपल्या पाचव्या संधीत मात्र 19.63 मी.चे अंतर पार करुन कास्यपदक आपल्या नावावर केले.
सरिताला पदक बहाल
इंचियोन : आशियाई स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या पथकाचे प्रमुख आदिले सुमारीवाला यांचा हस्तक्षेप आणि भारताची महिला बॉक्सर एल़ सरितादेवी हिने आशियाई स्पर्धेत पदक स्वीकारण्यास इन्कार करण्याच्या घटनेवर खेद व्यक्त केल्यानंतर आशियाई ऑलिम्पिक परिषदेने (ओसीए) गुरुवारी सरिताला कांस्यपदक बहाल केल़ेभारतीय पथकाचे प्रमुख आदिले सुमारीवाला यांनी सांगितले की, ओसीएच्या वर्किग ग्रुपच्या बैठकीत सहभाग नोंदविला होता़ आशियाई स्पर्धेतील पदक वितरण सोहळ्यात जी घटना घडली, त्याबद्दल खंत व्यक्त केली़ तसेच बॉक्सर सरिताकडून भावनेच्या भरात ही चूक घडली,असेही बैठकीत सांगितल़े त्यानंतर आयोजकांनी सरिताला कांस्यपदक बहाल करण्याचा निर्णय घेतला़
आशियाई स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये लाईटवेट गटातील उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या जिना पार्कविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करूनही पंचांनी पार्कला विजयी घोषित केले होत़े त्यामुळे तिचे सुवर्ण मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले होत़े यानंतर सरिताने खेद व्यक्त करताना पदक वितरण सोहळ्यात कांस्यपदक स्वीकारण्यास इन्कार केला होता़