शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

भारताचा दुहेरी 'सुवर्ण'वेध; 27 पदकांसह तिसऱ्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 10:58 AM

जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताने शुक्रवारी दोन सुवर्णपदक जिंकली. भारताच्या विजयवीर सिधूने कनिष्ठ गटातील 25 मीटर स्टँडर्ड पिस्तुल प्रकारात 572 गुणांसह वैयक्तिक गटाचे सुवर्णपदक नावावर केले.

चँगवॉनः जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताने शुक्रवारी दोन सुवर्णपदक जिंकली. भारताच्या विजयवीर सिधूने कनिष्ठ गटातील 25 मीटर स्टँडर्ड पिस्तुल प्रकारात 572 गुणांसह वैयक्तिक गटाचे सुवर्णपदक नावावर केले. याच प्रकाराच्या सांघिक गटात विजयवीरने राजकनवर संधू व आदर्श सिंग यांच्यासह 1695 गुणांसह सुवर्णपदक जिंकत भारतासाठी सुवर्ण लक्ष्यभेद केला. भारताच्या या कनिष्ठ खेळाडूंनी चीन व कोरिया यांचे कडवे आव्हान परतवून लावले. वैयक्तिक गटात विजयवीरने कोरियाच्या गनहीयोक ली ( 570) आणि चीनच्या हाओजे जहू ( 565) यांना पराभूत केले. दोघांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सांघिक गटात भारताने 1695 गुणांसह वर्चस्व गाजवले, परंतु कोरियन संघाने त्यांना कडवी टक्कर दिली. अवघ्या दोन गुणांच्या फरकाने कोरियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चेस प्रजासत्ताक संघाला 1674 गुणांसह कांस्यपदक जिंकण्यात यश आले. तत्पूर्वी, पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तुल प्रकारात भारताच्या गुरप्रीत सिंगने रौप्यपदक जिंकले. त्याने 579 गुणांची कमाई केली. या पदकांसह भारताच्या खात्यात 11 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्यपदकं जमा झाली आहेत. 

टॅग्स :Shootingगोळीबार