शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

अनिर्णित कसोटीत भारताचे वर्चस्व

By admin | Updated: June 15, 2015 01:07 IST

आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनचे पाच बळी व हरभजनसिंगचा अचूक मारा याच्या जोरावर भारताने एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशला फॉलोआॅन

फतुल्ला : आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनचे पाच बळी व हरभजनसिंगचा अचूक मारा याच्या जोरावर भारताने एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशला फॉलोआॅन स्वीकारण्यास बाध्य केले, पण पाचव्या दिवशीही पावसाच्या लपंडावामुळे सामना अखेर अनिर्णित संपला. या लढतीत २५० पेक्षा अधिक षटकांचा खेळ पावसामुळे वाया गेला. या कसोटीत पूर्ण तीन दिवसांचा खेळही शक्य न झाल्यामुळे पाहुण्या संघाला अनुकूल निकाल मिळविता आला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने खेळाच्या सर्वच विभागांत वर्चस्व गाजवले. त्यामुळे गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेपूर्वी भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावण्यात मदत मिळेल.भारताने पहिला डाव ६ बाद ४६२ धावासंख्येवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशने पाचव्या व अखेरच्या दिवशी ३ बाद १११ धावसंख्येवरून प्रारंभ केला. पहिल्या सत्रात पावसामुळे खेळ शक्य झाला नसला, तरी बांगलादेशचा पहिला डाव ६५.५ षटकांत २५६ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोआॅन स्वीकारण्याची नामुष्की ओढवली. भारतातर्फे आश्विनने २५ षटकांत ८७ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर हरभजनने १७.५ षटकांत ६४ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना माघारी परतवले. हरभजनने आज पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमला पिछाडीवर सोडताना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नववा सर्वांत यशस्वी गोलंदाज होण्याचा मान मिळवला. फॉलोआॅननंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात १५ षटकांत बिनबाद २३ धावा केल्या असता, उभय कर्णधारांनी सामना अनिर्णित संपल्याचे मान्य केले. त्या वेळी तमीम इक्बाल १६ व इमरुल कायेस ७ धावा काढून नाबाद होते. बांगलादेशतर्फे पहिल्या डावात इमरुल कायेसने सर्वाधिक ७२ धावा केल्या, पण पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या लिट्टन दासने सर्वांना प्रभावित केले. लिट्टन दासने ४५ चेंडूंमध्ये ४५ धावांची आक्रमक खेळी केली. लिट्टनला आश्विनने तंबूचा मार्ग दाखवला. त्याने ८ चौकार व १ षटकार ठोकला. सौम्य सरकारने (३७) आक्रमक फलंदाजी केली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.आजच्या दोन सत्रांत आश्विनने वर्चस्व गाजवले. आश्विनने सर्वप्रथम साकिब अल-हसनला (९) बाद केले. त्यानंतर सरकारने कायेसच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. हरभजनने कायेसला बाद करीत या सामन्यात वैयिक्तक दुसरा बळी घेतला. कायेस हरभजनचा कारकिर्दीतील ४१५ वा बळी ठरला. हरभजन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत यशस्वी गोलंदाजांमध्ये नवव्या स्थानी पोहोचला. त्याने आज अक्रमचा (१०२ सामने, ४१४ बळी) विक्रम मोडला. त्यानंतरच्या षटकात वरुण अ‍ॅरोनने सरकारचा त्रिफळा उडवत सामन्यातील पहिला बळी घेतला. आश्विनने शुवागता होम (९) याला माघारी परतवल्यामुळे बांगलादेशची ७ बाद २१९ अशी अवस्था झाली. चहापानानंतर लिट्टन बाद झाला. त्यानंतर हरभजनने मोहम्मद शाहिदला तंबूचा मार्ग दाखवला, तर जुबेर हुसेन धावबाद झाल्यामुळे बांगलादेशचा डाव संपुष्टात आला. (वृत्तसंस्था)