शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भारताची श्रीलंकेवर १५७ धावांची आघाडी

By admin | Updated: August 23, 2015 02:22 IST

श्रीलंकेचा कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजने झळकविलेल्या झुंझार शतकी खेळीनंतरही भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला ३०६ धावांत रोखले. शनिवारी तिसऱ्या दिवसाअखेर भारताने दुसऱ्या

कोलंबो : श्रीलंकेचा कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजने झळकविलेल्या झुंझार शतकी खेळीनंतरही भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला ३०६ धावांत रोखले. शनिवारी तिसऱ्या दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावांत १ बाद ७० धावा केल्या असून, पहिल्या डावातील ८७ धावांसह भारताने १५७ धावांची आघाडी घेतली आहे. कालच्या ३ बाद १४० धावसंख्येवरून पुढे खेळताना मॅथ्यूज (१०२) व लाहिरू थिरिमाने (६२) यांनी चौथ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केल्यामुळे श्रीलंका संघ पहिल्या डावात आघाडी मिळवणार, असे चित्र होते, पण त्यानंतर ६५ धावांच्या मोबदल्यात अखेरचे ७ गडी तंबूत परतले. चहापानाच्या ब्रेकनंतर श्रीलंकेचा पहिला डाव ३०६ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे लेगस्पिनर अमित मिश्राने २१ षटकांत ४३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. ईशांत शर्मा व आश्विन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. भारताची दुसऱ्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्या डावातील शतकवीर के. एल. राहुल (२) पहिल्याच षटकात माघारी परतला. त्याला धम्मिका प्रसादने बाद केले. त्यानंतर मुरली विजय (नाबाद ३९) व अजिंक्य रहाणे (नाबाद २८) यांनी संयमी फलंदाजी करीत दिवसअखेर भारताला दुसऱ्या डावात १ बाद ७० धावांची मजल मारून दिली. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असलेल्या या कसोटीत भारताकडे एकूण १५७ धावांची आघाडी आहे. श्रीलंकेचा कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजची शतकी खेळी तिसऱ्या दिवसाच्या खेळाचे आकर्षण ठरली. त्याने १२ चौकार ठोकले. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात श्रीलंका संघाने वर्चस्व गाजवले. त्यांनी उपाहारापर्यंत ३ बाद २२४ धावांची मजल मारली. उपाहारानंतर ईशांतच्या स्पेलने सामन्याचे चित्र पालटले. ईशांतने सुरुवातीला थिरिमानेला माघारी परतवले. त्यानंतर पावसामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. त्यानंतर खेळास प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या कसोटी सामन्याचा हिरो दिनेश चंडीमलला (११) ईशांतने बाद केले. मॅथ्यूजने कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक ९८ व्या षटकात १६४ चेंडूंमध्ये पूर्ण केले. दरम्यान, शतक साकारल्यानंतर मॅथ्यूजला अधिक वेळ टिकाव धरता आला नाही. स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल पहिल्या स्लिपमध्ये तैनात मुरली विजयने टिपला. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी ७४ धावांत चार बळी घेतले. मिश्राने जेहान मुबारकला (२२) बाद केले. पाठोपाठ रंगाना हेराथला आश्विनने तर थारिंडू कौशलला मिश्राने बाद करीत श्रीलंकेचा डाव संपुष्टात आणला.धावफलकभारत पहिला डाव : ३९३.श्रीलंका पहिला डाव : दिमुथ करुणारत्ने पायचित गो. यादव ०१, कौशल सिल्वा झे. आश्विन गो. मिश्रा ५१, कुमार संगकारा झे. रहाणे गो. आश्विन ३२, लाहिरू थिरिमाने झे. साहा गो. शर्मा ६२, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज झे. विजय गो. बिन्नी १०२, दिनेश चंडीमल झे. राहुल गो. शर्मा ११, जेहान मुबारक त्रि. गो. मिश्रा २२, धम्मिका प्रसाद झे. रहाणे गो. मिश्रा ०५, रंगाना हेराथ पायचित गो. आश्विन ०१, थारिंडू कौशल यष्टिचित साहा गो. मिश्रा ०६, दुश्मंता चामीरा नाबाद ००. अवांतर (१३). एकूण १०८ षटकांत सर्व बाद ३०६. गोलंदाजी :- ईशांत शर्मा २१-३-६८-२, उमेश यादव १९-५-६७-१, स्टुअर्ट बिन्नी १८-४-४४-१, रवीचंद्रन आश्विन २९-३-७६-२, अमित मिश्रा २१-३-४३-४. भारत दुसरा डाव : मुरली विजय खेळत आहे ३९, के. एल. राहुल त्रि. गो. प्रसाद ०२, अजिंक्य रहाणे खेळत आहे २८. अवांतर : (१). एकूण : २९.२ षटकांत १ बाद ७०. गोलंदाजी : धम्मिका प्रसाद ४-०-१२-१, रंगाना हेराथ ११.२-३-२३-०, दुष्मंत चामीरा ४-०-१४-०, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज २-१-१-०, थारिंंडू कौशल ८-०-२०-०.