शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:31 IST

२१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची दमदार सुरुवात करताना यजमान भारताने पुरुष आणि महिला या दोन्ही गटातून सुपर आठ फेरीत प्रवेश केला.

कटक : येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची दमदार सुरुवात करताना यजमान भारताने पुरुष आणि महिला या दोन्ही गटातून सुपर आठ फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय खेळाडूंनी यादरम्यान केवळ दोन गेम गमावले. पुरुषांमध्ये अचंता शरथ कमल याने सिंगापूरच्या जेयू क्लेयरेन्सच्यूविरुद्ध, तर महिलांमध्ये अहलिका मुखर्जीने श्रीलंकेच्या चमातसारा फर्नांडोविरुद्ध प्रत्येकी एक गेम गमावला.पुरुष गटात संघ व्यवस्थापनाने शरथ कमल, जी. साथियान आणि हरमीत देसाई या अनुभवी खेळाडूंवर भरवसा दाखवला. आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविताना या तिघांनी प्रथम स्कॅटलंड आणि त्यानंतर सिंगापूर या संघांना प्रत्येकी ३-० असा धक्का दिला. महिलांमध्ये मात्र भारतीय संघाने दोन्ही सामन्यांत वेगळा चमू खेळवला. मनिका बत्रा, अर्चना कामत आणि अहलिका यांनी प्रथम श्रीलंकेला ३-० असे नमविले. यानंतर द. आफ्रिकाविरुद्ध अर्चना, मधुरिका पाटकर आणि सुचित्रा मुखर्जी यांना खेळविण्यात आले. त्यांनी भारताचा सलग दुसरा विजय मिळवताना ३-० अशी बाजी मारली. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :Table Tennisटेबल टेनिसIndiaभारत