शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोत्तम कामगिरीसाठी भारतीय पथक सज्ज, टोकिये ऑलिंपिकनंतर मेरी कोम निरोप घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 06:25 IST

मेरीकोम : टोकियो आॅलिम्पिकनंतर घेणार निरोप

नवी दिल्ली : पाचवेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणारी महिला बॉक्सर एम.सी. मेरीकोमला य्एआयबीए महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये स्वत:सह भारतीय पथकाकडून सर्वोत्तम कामगिरीची आशा आहे. मेरीकोमने (४८ किलो) विश्व चॅॅम्पियनशिपमध्ये पाच सुवर्ण व एका रौप्यपदकासह एकूण सहा पदके पटकाविली आहेत. ती सहावे सुवर्णपदक पटकविण्यास उत्सुक आहे. मेरीकोम पूर्णपणे फिट असून २०२० टोकियो आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आपल्या कारकिर्दीचा समारोप करण्यास इच्छुक आहे.

दहाव्या एआयबीए महिला विश्वचॅम्पियनशिपची ‘शुभेच्छा दूत’ असलेली मेरीकोम येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाली, ‘तयारी चांगली सुरू असून अनेक देशांच्या बॉक्सर्सविरुद्ध आम्ही सराव केला आहे. वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत सराव केल्यामुळे अनुभव मिळतो. प्रशिक्षकही सर्वांकडून मेहनत करवून घेत आहेत. आम्ही सर्व बॉक्सर्सही सर्वोत्तम तयारी करीत आहोत.’ फिनलँडची बॉक्सर मीरा पोटकोनेन (६० किलो) यावेळी उपस्थित होती. ती जानेवारी महिन्यात इंडिया ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. तिचा हा भारताचा दुसरा दौरा आहे. ती म्हणाली, ‘जानेवारीमध्येही इंडिया ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी येथे आली होती आणि विजय नोंदवला होता. दुसºयांदा येथे आल्यामुळे आनंद झाला. मी विश्व चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी अमेरिका व फ्रान्समध्ये शिबिरात सराव केला. तयारी बघता आगामी काही दिवसांमध्ये विश्व चॅम्पियन होण्यासाठी सज्ज आहे.’ प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी बंदीस्त सरावमेरीकोम म्हणाली, ‘आम्ही ज्यावेळी विदेशात जातो त्यावेळी तेथील परिस्थितीसोबत जुळवून घ्यावे लागते. हा खेळाचा भाग आहे. प्रदूषण निश्चितच समस्या आहे. पण त्यापासून बचाव करण्यासाठी आम्ही बंदिस्त स्टेडियममध्ये सराव करीत आहोत.’तीन अपत्यांची आई असलेल्या मेरीने फिटनेसबाबत बोलताना सांगितले, ‘मी पूर्ण फिट असून निश्चितच २०२० टोकियो आॅलिम्पिक खेळण्यास इच्छुक आहे.’ मेरीकोमने अलीकडेच आपल्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्डकोस्टमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. 

 

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग