शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Lakshya Sen Badminton, India in Paris Olympics 2024: हातातून रक्त येत होतं... 'तो' जिद्दीनं लढला, पण सामना हरला! 'ब्राँझ'चं 'लक्ष्य' हुकलं, देशवासीयांचं स्वप्न भंगलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 19:35 IST

Lakshya Sen Badminton, India in Paris Olympics 2024: पहिला गेम हरल्यानंतर तुफानी कमबॅक करत मलेशियाच्या ली झी जियाने भारताच्या लक्ष्य सेनला पराभूत केले.

Lakshya Sen Badminton, India in Paris Olympics 2024: भारताच्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या सामन्यात भारतीयांची निराशा केली. सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या दोन खेळाडूंची आज कांस्यपदकासाठी लढत झाली. त्यात मलेशियाच्या ली झी जिया याने लक्ष्य सेनवर १३-२१, २१-१६, २१-११ अशा तीन गेममध्ये विजय मिळवला. लक्ष्य सेनकडून भारतीयांना चौथ्या कांस्यपदकाची आशा होती. लक्ष्यने सुरुवात दमदारे केली होती, पण नंतर त्याला आपली आक्रमकता टिकवून ठेवणे शक्य झाले नाही. दुखापतीमुळे त्याच्या कोपरातून रक्त येत असूनही त्याने सामना खेळला, पण अखेर पदरी निराशा आली.

पहिला गेम सहज जिंकला!

पहिल्या सेटमध्ये दोनही खेळाडू सुरुवातीला बचावात्मक खेळ करत होते. पण लक्ष्य सेनने हळूहळू प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दोघांमधील अंतर खूपच कमी होते. पण त्यानंतर लक्ष्य सेनने झटपट पॉइंट्स कमावत आघाडी वाढवली आणि अखेर २१-१३ असा पहिला गेम जिंकला.

रोमांचक झाला दुसरा गेम

दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने दमदार सुरुवात केली. लक्ष्यने ८-४ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर जिया लीने मागून येऊन सेनला ओव्हरटेक केले. त्याने आधी ८-८ अशी बरोबरी केली. त्यानंतर १२-८ अशी आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्यने कमबॅक केले. त्यानेही १२-१२ अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघांमध्ये निकराची झुंज पाहायला मिळाली. पण अखेर ली झी जियाने २१-१६ ने दुसरा गेम जिंकला.

निर्णायक गेममध्ये लक्ष्य सेन हतबल

तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये लक्ष्य सेनला काही कळण्याआधीच ली जियाने ९-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर लक्ष्य सेनने काही वेळा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. गेम हळूहळू पुढे गेला पण लक्ष्यला डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही. अखेर मलेशियाच्या ली जियाने २१-११ ने तिसरा गेम जिंकत ब्राँझ मेडल जिंकले.

तत्पूर्वी, काल उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने लक्ष्य सेनला पराभूत केले होते. लक्ष्यने संपूर्ण सामन्यात चमकदार खेळ केला, परंतु छोट्या चुका त्याला महागात पडल्या. त्यामुळेच एक्सेलसेनने २२-२०, २१-१४ अशा दोन सरळ गेममध्ये सामना जिंकला.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४BadmintonBadmintonIndiaभारत