शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

भारतीय नेमबाजांचे ‘मिशन विश्वकप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 03:55 IST

नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.

मॉस्को : नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.जगभरातील शॉटगन नेमबाजांसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. कारण, चांगल्या कामगिरीसह नवी दिल्लीत पुढील महिन्यात आयोजित विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान पटकावण्याची संधी याच स्पर्धेद्वारे मिळेल. पाचही स्पर्धेतील पदकविजेते विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळतील. डबल ट्रॅपचे नेतृत्व २६ वर्षांचा कयनान चेनाई करेल. त्याने अलीकडे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते. त्याच्या सोबतीला जोरावरसिंग आणि बिरेनदीपसिंग हे आहेतच. स्कीट प्रकारात मैराज अहमद खान हा भारताकडून पदकाचा प्रबळ दावेदार आहे. महिला गटात रश्मी राठोड आव्हान सादर करेल. अस्ताना येथे माहेश्वरी चौहान हिने स्कीटमध्ये आंतरराष्टÑीय पदक जिंकले होते. पुरुष स्कीट संघात मैराजशिवाय अंगदवीरसिंग बाजवा आणि शिराजसिंग; तर महिला ट्रॅप संघात राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग आणि सीमा तोमर आव्हान सादर करतील. ज्युनियर गटात १५ वर्षांचा शपथ भारद्वाज याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. याशिवाय, मानवादित्यसिंग राठोड, लक्ष्य आणि अनंतजितसिंग नरुका हेदेखील पदकाचे दावेदार असतील. (वृत्तसंस्था)भारताकडून आतापर्यंत केवळ अंकुर मित्तल हाच नवी दिल्लीच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याने दिल्ली आणि मेक्सिको येथील पहिल्या दोन फेºयांमध्ये रौप्य आणि सुवर्णपदक जिंकले होते. डबल ट्रॅपचा तज्ज्ञ खेळाडू मित्तल याला सध्याच्या स्पर्धेतही पदकाची आशा आहे.अंकुर मित्तलने याच महिन्यात अस्ताना येथे आशियाई शॉटगन स्पर्धेचे सुवर्ण जिंकले होते. संग्राम दहिया आणि मोहंमद असाब हेदेखील मित्तलसोबत स्पर्धेत सहभागी होणार आहेत.