भारतीय नेमबाज पौर्णिमाचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 01:29 AM2020-06-23T01:29:29+5:302020-06-23T01:29:32+5:30

पौर्णिमाने अनेक आयएसएसएफ विश्वकप, आशियाई चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल चॅम्पियनशिप व्यतिरिक्त अन्य स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Indian shooter Pournima dies | भारतीय नेमबाज पौर्णिमाचे निधन

भारतीय नेमबाज पौर्णिमाचे निधन

Next

नवी दिल्ली : कॅन्सरपीडित माजी भारतीय नेमबाज पौर्णिमा जनेनचे निधन झाले. त्यानंतर आॅलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रासह देशातील नेमबाजी वर्तुळाने तिच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला. पौर्णिमा ४२ वर्षांची होती. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाची (आयएसएसएफ) परवानाप्राप्त प्रशिक्षक पौर्णिमा गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरने आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते. माजी भारतीय नेमबाज जॉयदीप करमाकरच्या मते, उपचारानंतर ती या आजारातून जवळजवळ सावरली होती. पौर्णिमाने अनेक आयएसएसएफ विश्वकप, आशियाई चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल चॅम्पियनशिप व्यतिरिक्त अन्य स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १० मीटर एअर रायफलमध्ये राष्ट्रीय विक्रमवीर पौर्णिमाला प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारतर्फे शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Web Title: Indian shooter Pournima dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.