शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Good News: भारतीय नेमबाज ओम प्रकाशने जिंकले जागतिक स्पर्धेत सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 09:00 IST

भारताचा 23 वर्षीय ओम प्रकाश मिथर्वालने दक्षिण कोरियात सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

चांगवॉनः भारताचा 23 वर्षीय ओम प्रकाश मिथर्वालने दक्षिण कोरियात सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने 50 मीटर पिस्तुल प्रकारात 564 गुणांच्या कमाईसह भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कनिष्ठ गटात पुरुषांच्या 50 मीटर पिस्तुल वैयक्तिक आणि सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मिथर्वाल हा पहिलाच भारतीय नेमबाज आहे. स्पर्धेतील या प्रकारात 2014साली जितू रायने रौप्यपदक जिंकून दिले होते. त्यानंतर पदक जिंकणारा मिथर्वाल हा पहिलाच भारतीय आहे. मात्र, यंदा जितू रायला अपयश आले आणि त्याला 552 पदकांसह 17व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 50 मीटर पिस्तुल प्रकार ऑलिम्पिकमध्ये नसल्याने मिथर्वालला ऑलिम्पिकला कोटा मिळू शकलेला नाही. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिथर्वालने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 10 मीटर एअर पिस्तुल आणि 50 मी. पिस्तुल प्रकारांत कांस्यपदकं जिकंली होती. त्याने 10 मीटर पिस्तुल प्रकाराच्या पात्रता फेरीत 584 गुणांची नोंद करताना राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमाशी बरोबरी केली होती. दरम्यान महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकेर, हीना सिधू आणि श्वेता सिंग यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. त्यांना अनुक्रमे 13, 29 व 45 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :Shootingगोळीबार