जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा : ५३ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर पुणे : ट्रॅपझोन (तुर्कस्तान) येथे सुरू असलेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत भारतीय शालेय क्रीडापटूंनी आपापल्या क्रीडा प्रकारांत १० सुवर्ण, १८ रौप्य व २५ कांस्य, असे एकूण ५३ पदके जिंकली आहेत. पदक तालिकेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या लष्करी उठावाने निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाचे कोणतेही दडपण न घेता भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुलींच्या गटात सिद्धी हिरे, संगीता शिंदे, रोजलिन लुईस व सेमश्री या चौघींनी २००-४००-६००-८०० मीटर मिडले रिलेमध्ये रविवारी रौप्यपदक जिंकले.
भारतीय खेळाडूंची जिगरबाज कामगिरी
By admin | Updated: July 17, 2016 20:49 IST