शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

फिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 21:11 IST

कोलकाता: भारतातील तीन बुद्धिबळपटूंवर फिलिपीन्समध्ये हल्ला झाल्याची घटना गेल्या रविवारी रात्री घडली.  एशियन कॉन्टिनेंटल टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी बुद्धिबळपटू विदित ...

कोलकाता: भारतातील तीन बुद्धिबळपटूंवर फिलिपीन्समध्ये हल्ला झाल्याची घटना गेल्या रविवारी रात्री घडली.  एशियन कॉन्टिनेंटल टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी बुद्धिबळपटू विदित गुजराती, अभिजीत कुंटे आणि ललित बाबू फिलिपीन्समध्ये दाखल झाले आहेत. हे तिघेही हॉटेलपासून 250 मीटर लांब पाणी विकत घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी येथील स्थानिक गुंडांनी त्यांना मारहाण केली. ही घटना  मकाती शहरात घडली. दरम्यान, या घटनेची माहिती विदित गुजराती याने आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केली आहे. 

विदित गुजरातीने म्हटले आहे की, आम्ही तिघे पाणी विकत घेण्यासाठी हॉटेलच्या बाहेर गेलो होतो. त्यावेळी ही घटना घडली. आमच्यावर हल्ला होईल असा विचार सुद्धा मनात आला नव्हता. ज्यावेळी हल्ला करण्यात आला. तेव्हा आम्ही तेथून पळ काढला. मात्र गुंडांनी आमचा पाठलाग केला. मात्र, आम्ही थोडक्यात बचावलो. परंतू, ही घडलेली घटना विसरण्याचा प्रयत्न करत आहोत.  

याचबरोबर, एशियन कॉन्टिनेंटल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती येथील पोलिसांना सुद्धा नव्हती. त्यामुळे याठिकाणी सुरक्षा मिळू शकली नाही. तसेच, हॉटेलमधील जेवण खराब होते आणि त्याठिकाणी वाय-फायची सुद्धा सोय नव्हती, असे विदित गुजरातीने म्हटले आहे.   

टॅग्स :Chessबुद्धीबळ