शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

चौथ्या सामन्यासह भारताने ३ - ० अशी मालिका जिंकली

By admin | Updated: December 7, 2015 15:30 IST

चौथ्या व शेवटच्या कसोटीत दक्षिण अफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव करत भारताने ही मालिका ३ - ० अशी दणदणीत जिंकली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - चौथ्या व शेवटच्या कसोटीत दक्षिण अफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव करत भारताने ही मालिका ३ - ० अशी दणदणीत जिंकली आहे. चौथ्या कसोटीचा शिल्पकार दोन्ही डावांमध्ये शतकं झळकावण्याचा विक्रम करणारा अजिंक्य रहाणे ठरला असून पहिल्या डावात जाडेजाने तर दुस-या डावात अश्विनने पाहुण्यांचा अर्धा संघ गारद केला आणि रहाणेच्या खेळीचे चीज झाले. अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले असून अश्विनने मालिकावीराचा मान पटकावला आहे. सचिन तेंडुलकर व विरेंद्र सेहवाग यांच्या पंक्तीत अश्विन बसला असून मालिकावीराचा मान पाच वेळा पटकावणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. दरम्यान, अजिंक्य रहाणेने सामनावीराचे बक्षीस चेन्नईतल्या पूरग्रस्तांना देण्याची घोषणा केली आहे.
हाशिम आमला २४४ चेंडूंमध्ये २५ धावा व ए. बी. डिव्हिलियर्स २९७ चेंडूंमध्ये ४३ धावा, वगळता केवळ बावुमाने ११७ चेंडूंमध्ये ३४ धावा करत सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न केला. दुस-या डावात तब्बल १४२ षटकं किल्ला लढवणा-या अफ्रिकेने एकच्या सरासरीने १४३ धावा केल्या.
चहापानानंतर भारताने अफ्रिकेच्या डेन व्हिलासचा उमेश यादवने त्रिफळा उडवला आणि अश्विनने ए. बी. डिव्हिलियर्सला जाडेजाकरवी झेलबाद करत मुख्य अडथळा दूर केला. पाठोपाठ अॅबटचाही त्रिफळा उमेश यादवने उडवला. तर नंतर पिएटला वृद्धीमान साहाकरवी यादवने झेलबाद केले. मॉर्केलचा त्रिफळा उडवत अश्विनने आपला पाचवा बळी टिपला व अफ्रिकेचा डाव संपुष्टात आला. इमरान ताहीर शून्यावर नाबाद राहिला. दुस-या डावामध्ये अश्विनने पाच गडी बाज केले, तर उमेश यादवने ३ व जाडेजाने दोघांना तंबूत धाडले.
अजिंक्य रहाणेच्या दोन्ही डावांतील शतकांचं भारताच्या विजयामुळं चीज झालं आहे.
 
भारत वि. दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेची वैशिष्ट्ये :
 
-  मालिकेत सर्वाधिक धावा फटकवणारा फलंदाज - अजिंक्य रहाणे (२६६)
 
- मालिकेत सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज - आर. अश्विन (३१)
 
- चौथ्या कसोटीत भारताने आफ्रिकेवर ३३७ धावांनी मिळवला विक्रमी विजय. भारताने एवढ्या मोठ्या धावांच्या फरकाने जिंकलेला हा पहिलाच सामना आहे.