शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारताला कठीण ‘ड्रॉ’, सर्व बॉक्सर उपउपांत्यपूर्व फेरीसाठी रिंगणात उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:47 IST

शिवा थापा आणि विकास कृष्णन यांना सलामी लढतीत पुढे चालसह अव्वल मानांकन देण्यात आले असले तरी १९ व्या विश्व बॉक्सिंग स्पर्धेत कठीण ड्रॉ मिळाल्याने आठही भारतीयांची विजयाची वाट सोपी राहणार नाही.

हॅम्बुर्ग : शिवा थापा आणि विकास कृष्णन यांना सलामी लढतीत पुढे चालसह अव्वल मानांकन देण्यात आले असले तरी १९ व्या विश्व बॉक्सिंग स्पर्धेत कठीण ड्रॉ मिळाल्याने आठही भारतीयांची विजयाची वाट सोपी राहणार नाही.विकासला मिडलवेटमध्ये (७५ किलो) तिसरे मानांकन मिळाले. शिवाला लाईटवेट(६० किलो) गटात पाचवे मानांकन लाभले. सुमित सांगवान(९१ किलो) याला सहावे मानांकन देण्यात आले. सर्व बॉक्सर उपउपांत्यपूर्व फेरीसाठी रिंगणात उतरतील. सहा वर्षांपूर्वी कांस्य जिंकणाºया विकासला २७ आॅगस्ट रोजी केनियाचा जॉन कयालो आणि इंग्लंडचा बेंजामिन विटेकर यांच्यातील विजेत्याविरुद्ध लढत द्यावी लागेल. शिवाला २८ आॅगस्ट रोजी कझाखस्तानचा अ‍ॅडिलेट कुरमेतोव्ह आणि जॉर्जियाचा ओतर इरानोस्यान यांच्यातील विजेत्याविरुद्ध खेळायचे आहे. शिवाने २०१५ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते.आशियाई चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शिवा आणि अबुदुवइमोव यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. प्रतिस्पर्धी खेळाडूने हेडबट मारताच शिवा रक्तबंबाळ झाला होता. आशियाई चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता सुमित २७ आॅगस्ट रोजी आॅस्ट्रेलियाच्या जासन वेटले याच्याविरुद्ध खेळेल. त्यानंतर त्याची गाठ पडेल ती कझाखस्तानचा आॅलिम्पिक रौप्य विजेता बेसली लेविटविरुद्ध तिसरा मानांकित लेविट याने सुमितला ताश्कंद आशियाई चॅम्पियनश्पिमध्ये हरविले होते.मनोज कुमारला (६९ किलो) सलामीला व्हेसिली बेलोसचे आव्हान असेल. त्यानंतर त्याची गाठ पॅन अमेरिकन सुवर्ण विजेता गॅब्रिएल जोस मास्ट्रे पेरेझ याच्याविरुद्ध पडेल. आशियाई कांस्य विजेता सतीश कुमार(९१ किलोच्यावर), कविंदर बिश्त(५२ किलो), गौरव विधुडी (५६ किलो) आणि अमित फांगल(४९ किलो) हे देखील रिंगणात उतरणार आहेत.(वृत्तसंस्था)