शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत चांगली कामगिरी करेल, ‘गोल्डन बॉय’ने व्यक्त केला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 5:25 AM

‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली असून स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास ठळकपणे भारताचे यश दिसून येईल. पुढील वर्षी आॅस्टेÑलियामध्ये होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय संघ नक्कीच चमकदार कामगिरी करेल,’ असा विश्वास भारताचा दिग्गज नेमबाज आणि एकमेव आॅलिम्पिक सुवर्णपदकविजेता अभिनव बिंद्राने व्यक्त केला.

मुंबई : ‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली असून स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास ठळकपणे भारताचे यश दिसून येईल. पुढील वर्षी आॅस्टेÑलियामध्ये होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय संघ नक्कीच चमकदार कामगिरी करेल,’ असा विश्वास भारताचा दिग्गज नेमबाज आणि एकमेव आॅलिम्पिक सुवर्णपदकविजेता अभिनव बिंद्राने व्यक्त केला.मुंबईत सोमवारी टुरिझम आॅस्टेÑलियाच्या वतीने आगामी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी केलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. या वेळी, बिंद्राने भारताच्या कामगिरीबाबत विश्वास व्यक्तकेला. बिंद्रा म्हणाला, ‘राष्ट्रकुल स्पर्धा प्रत्येक अ‍ॅथलिटच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची स्पर्धा असते. राष्ट्रकुल, आशियाई अशा महत्त्वाच्या स्पर्धेत छाप पाडून प्रत्येक खेळाडू स्वत:ला प्रतिष्ठेच्या आॅलिम्पिकसाठी सज्ज करत असतो. प्रत्येक स्पर्धेत खेळाचा दर्जा वेगळा असतो आणि प्रत्येक दर्जा हा महत्त्वाचा ठरतो.’भारतीय नेमबाजीविषयी बिंद्राने म्हटले, ‘नेमबाजीबाबत सांगायचे झाल्यास भारतासाठी राष्ट्रकुलच्या तुलनेत आशियाई स्पर्धा अधिक खडतर असते, कारण तिथे बलाढ्य चीनचा सामना करायचा असतो. असे असले तरी राष्ट्रकुल स्पर्धेचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. प्रत्येक खेळासाठी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत वेगळा स्तर असतो.’ त्याचप्रमाणे, ‘नवीन नियमानुसार नेमबाजीची अंतिम फेरीशून्यापासून सुरू होते आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक खेळाडूलासंधी असते. त्यामुळे भारतीयांसाठी ही स्पर्धा खूप मोठे आव्हान ठरेल,’ असेही बिंद्राने म्हटले.विश्वचषकच्या तुलनेत आॅलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अपयशी ठरतात यावर बोलताना बिंद्रा म्हणाला, ‘विश्वचषक आणि आॅलिम्पिक पूर्णपणे वेगळ्या स्पर्धा आहेत. विश्वचषकाच्या चार-पाच स्पर्धा दरवर्षी खेळवल्या जातात, तर आॅलिम्पिक स्पर्धा चार वर्षांतून एकदा होेते, त्यामुळे आॅलिम्पिकसाठी मजबूत तयारी करावी लागते. विश्वचषकाच्या पहिल्या स्पर्धेत चांगली कामगिरी न झाल्यास तुम्हाला लगेच दोन आठवड्यांनी दुसरी संधी मिळते. पण आॅलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरीला पर्याय नसतो.’त्याचप्रमाणे, ‘मी जीएसटीचा अभ्यास केलेला नाही. परंतु, जीएसटीमुळे क्रीडासाहित्य किमती वाढल्या असल्याचे ऐकले आहे. जर हे खरं असेल, तर खेळाडूंसाठी खूप चिंतेची बाब असेल. इतर क्रीडाप्रकारापेक्षा नेमबाजी खर्चिक खेळ असून जर साहित्यांच्याकिमती खरंच वाढल्या असतील, तर खेळाडूंपुढे नवे आव्हान असेल. मला आशा आहे याबाबत नक्कीच काही तरी सकारात्मक बाब घडेल,’ असेही बिंद्राने म्हटले.मी कारकिर्दीमध्ये एकूण पाच आॅलिम्पिक स्पर्धा खेळलो आणि यामध्ये सिडनी आॅलिम्पिक माझी आवडती स्पर्धा आहे. आॅस्टेÑलियन्सकडून मला खूप प्रेम मिळाले. तसेच, सिडनी आॅलिम्पिकमध्ये मी १० किंवा ११ व्या स्थानी राहिलेलो, पण या स्पर्धेतूनच एक दिवस मी सुवर्णपदक पटकावू शकतो, असा विश्वास मिळाला.- अभिनव बिंद्रा