शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

कबड्डीत पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून भारत फायनलमध्ये; विक्रमी फरकाने शेजाऱ्यांना लोळवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 13:44 IST

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज कबड्डीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते.

IND Vs PAK Kabaddi : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज कबड्डीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. सामना सुरू होताच पाकिस्तानी संघाला ४-० ने आघाडी घेण्यात यश आले पण नंतर शेजाऱ्यांचे धाबे दणाणले. भारताच्या नवीन कुमारने सुपर रेड करून सुरूवातीलाच प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का दिला. ११-४ असे गुण असताना पाकिस्तानी संघ पहिल्यांदा ऑलआउट झाला अन् भारताने सरशी घेतली. खरं तर पाकिस्तानने ४-० अशी लीड घेतली होती पण नंतर नवीन कुमारने सलग ९ गुण घेतले. त्यानंतर पहिल्या हाफमध्ये तीन लोण चढवून ३०-५ अशी भारताला आघाडी मिळवून दिली.

नवीन कुमारने पाकिस्तानी बचावपटूंना लोळवून वैयक्तिक १० गुण मिळवत भारताचा दबदबा कायम राखला. भारताचे २० गुण असताना शेजाऱ्यांचा संघ दुसऱ्यांदा तंबूत परतला. विशाल भारद्वाजच्या चालाकीमुळे भारताच्या बचावफळीला पहिला गुण घेण्यात यश आले. पहिल्या हाफमध्ये पाकिस्तान तिसऱ्यांदा ऑलआऊट झाला. भारताकडे तेव्हा २५ गुणांची आघाडी होती. पहिला हाफ भारत ३०-५ पाकिस्तान अशा फरकाने संपला.

दुसऱ्या हाफमध्ये काहीतरी चमत्कार होईल अशी आशा पाकिस्तानी चाहत्यांना होती. पण भारतीय शिलेदारांनी अष्टपैलू कामगिरी करून सामना एकतर्फी केला. ४०-८ अशी गुणसंख्या असताना पाकिस्तान चौथ्यांदा ऑलआउट झाला. भारताने गुणांचे अर्धशतक झळकावताच पाकिस्तानी संघ पाचव्यांदा तंबूत परतला. दुसरा हाफ संपण्याच्या मार्गावर असताना भारताने विक्रमी ५९ गुण मिळवले.  लक्षणीय बाब म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सहाव्यांदा ऑलआउट करून भारताने विजयावर शिक्कामोर्तब केला. यासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने पाकिस्तानचा ६१-१४ असा दारूण पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानविरूद्धचा विजयरथ भारतीय शिलेदारांनी सुरूच ठेवला आहे. 

 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानKabaddiकबड्डी