शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

चाळीशीतही भाऊला तोड नाही; सुनील छेत्रीचा कमबॅकमध्ये फिट अन् हिट शो! (VIDEO)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 23:50 IST

अबतक ९५.. शंभरीचा आकडा गाठण्याची पुन्हा निर्माण झालीये संधी

भारताचा स्टार फुटबॉलपटूसुनील छेत्री निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. अनेक दिवस मैदानापासून दूर राहिल्यावरही कमबॅकच्या सामन्यात त्याने कमालीचा फिटनेससह हिट शो दाखवून दिला. मालदीव विरुद्धच्या लढतीत सुनील छेत्रीनं एक गोल डागल्याचेही पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वयाच्या चाळीशीत पुन्हा मैदानात उतरलाय छेत्री

सुनील छेत्रीनं मागील वर्षात जूनमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या या निर्णयामुळे भारतीय संघाचा मोठा आधार नाहीसा झाला. गोल डागणाऱ्यांची उणीव भासू लागल्यावर वयाच्या चाळीशीतही या गड्यानं पुन्हा भारतीय फुटबॉल संघाकडून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच सामन्यात गोल करून त्याने हा निर्णय योग्य असल्याचेही सिद्ध केले आहे. 

अखेरच्या काही मिनिटांत दिसला सुनील छेत्रीचा जलवा

मालदीव विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात भारतीय संघाला पहिला गोल डागण्यासाठी जवळपास अर्धा तास प्रतिक्षा करावी लागली. ३४ व्या मिनिटात राहुल भेकेनं पहिला गोल डागला. या गोलसह भारतीय संघानं आघाडी घेतली.  त्यानंतर ६६ व्या मिनिटाला कॉर्नरची संधी गोलमध्ये रुपांतरित करत भारताने दुसरा गोल डागून आघाडी आणखी भक्कम केली. या दोन गोलनंतर  सर्वांच्या नजरा या सुनील छेत्रीवर खिळल्या होत्या. तो कमबॅकच्या सामन्यात गोल करणार का? असा प्रश्न अनेक फुटबॉल चाहत्यांना पडला असताना अखेरच्या काही मिनिटांत सुनील छेत्रीनं आपला जलवा दाखवून दिला. भारतीय संघानं हा सामना सहज जिंकला. आता २५ मार्चला भारत-बांगलादेश यांच्यात लढत रंगणार आहे. या सामन्यातही सर्वांच्या नजरा या सुनील छेत्रीवर असतील. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल डागणारे फुटबॉलर

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वलस्थानावर आहे. त्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत १३५ गोल डागले आहेत. या यादीत ११२ गोलसह लियोनेल मेस्सी दुसऱ्या स्थानावर असून इराणच्या अली दाई या दिग्गजाच्या खात्यात १०८ गोलची नोंद आहे. सुनील छेत्री हा चौथ्या स्थानावर असून मालदीव विरुद्धच्या गोलसह त्याच्या खात्यात आता ९५ गोलची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शंभर गोल डागण्यासाठी त्याला आता फक्त ५ गोल करायचे आहेत.  

टॅग्स :Sunil Chhetriसुनील छेत्रीFootballफुटबॉलViral Videoव्हायरल व्हिडिओViral Photosव्हायरल फोटोज्