शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

भारत अ संघाची कसोटी लागणार

By admin | Updated: August 6, 2015 22:59 IST

आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध नुकत्याच झालेल्या चार दिवसीय अनधिकृत दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये पराभव पत्करल्यानंतर भारत ‘अ’ संघ आता त्रिकोणीय एकदिवसीय

चेन्नई : आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध नुकत्याच झालेल्या चार दिवसीय अनधिकृत दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये पराभव पत्करल्यानंतर भारत ‘अ’ संघ आता त्रिकोणीय एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका ‘अ’चा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारत ‘अ’समोर शुक्रवारी बलाढ्य आॅस्टे्रलिया ‘अ’ संघाला रोखण्याचे मुख्य आव्हान असेल. भारताच्या कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारणारा उन्मुक्त चंद याची मोठी कसोटी लागेल.भारत दौऱ्यावर आलेल्या आॅसी संघाचे यजमानांविरुद्ध चांगले वर्चस्व राहिले असून, दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी १-० अशी बाजी मारली. यानंतर त्रिकोणीय एकदिवसीय मालिकेतदेखील विजयी सुरुवात करताना आॅसी संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला १० विकेटनी नमविले होते. भारतीय संघातील अनेक खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असून, मनीष पांड्ये, केदार जाधव, संजू सॅमसन, करुण नायर आणि कर्ण शर्मा यांचे या सामन्यातून राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न असतील. या स्पर्धेत चमकदार कामगिरीच्या जोरावर मुख्य राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळविण्याचा प्रयत्न या खेळाडूंचा असेल. दरम्यान, दोन अनधिकृत कसोटी मालिकांत खेळलेला करुण नायर या एकमेव खेळाडूचा भारतीय संघात समावेश आहे. गोलंदाजीमध्ये भारतीय संघ समतोल दिसत असून, संदीप शर्मा, रुश कालरा, रिषी धवन आणि धवल कुलकर्णी यांच्यावर भारतीय संघाची गोलंदाजी अवलंबून असेल. दुसऱ्या बाजूला पाहुण्या आॅसी संघाने भारतीय वातावरणात स्वत:ला चांगलेच जुळवून घेतले असून, विजयी कामगिरी कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.कर्णधार उस्मान ख्वाजा याचे नेतृत्वगुण आॅसी संघासाठी निर्णायक ठरत आहेत. एकूणच आॅसी संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ घरच्या वातावरणाचा कशा प्रकारे फायदा करून घेईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (क्रीडा प्रतिनिधी)