शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

इंडिया ओपन मुष्टियुद्ध : मेरी कोम फायनलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:12 IST

पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरि कोमने इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे; परंतु शिवा थापाला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यपदकावरच समाधान मानावे लागले.

नवी दिल्ली - पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरि कोमने इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे; परंतु शिवा थापाला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यपदकावरच समाधान मानावे लागले.बाराव्या मानांकित मेरिकोमचा ४८ किलो वजन गटात मंगोलियाच्या अल्टेनसेटसेग हिच्याशी होता. मेरिकोमने प्रारंभापासूनच आघाडी घेत आक्रमक पवित्रा अवलंबला. अखेरच्या मिनिटात ती थकली होती; परंतु तिने तिची लय कायम ठेवली. आता तिचा सामना फिलिपाईन्सच्या जोसी गाबुको हिच्याशी होईल. गाबुकोने द्वितीय मानांकित स्थानिक खेळाडू मोनिकावर विजय मिळवला.पुरुष गटात विश्व आणि आशियाई पदकविजेत्या शिवा थापाला ६0 किलो वजन गटात कास्यपदकावर समाधान मानावे लागले. तो भारताच्याच मनीष कौशिक याच्याकडून पराभूत झाला. मनीषकडून शिवा याला दुसºयांदा पराभव पत्करावा लागला. याआधी गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने शिवाला पराभूत केले होते. आशियाई कास्यपदकप्राप्त आणि फ्लायवेटमधील अव्वल मानांकित अमित पांगल फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याने आपल्याच देशाच्या एन. लालगियाकिम्मा याला पराभूत केले. महिला गटात अव्वल मानांकित एल. सरिता देवी हिने ६0 किलो वजन गटात आपल्याच देशाच्या प्रियंकाला पराभूत केले. आता तिची लढत फिनलँडच्या आॅलिम्पिक आणि विश्व कास्यपदकप्राप्त मीरा पोटकोनेन हिच्याशी होईल.विश्व युवा चॅम्पियन आणि अव्वल मानांकित शशी चोपडाने ५७ किलो वजन गटात आपल्याच देशाच्या सोनियाला पराभूत केले. माजी विश्व रौप्यपदकप्राप्त सरजूबाला देवी हिने ५१ किलो वजन गटात कास्यपदक जिंकले.

टॅग्स :Mary Komमेरी कोमIndiaभारतboxingबॉक्सिंग