शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

भारताने किवींची केली शिकार

By admin | Updated: July 9, 2015 04:48 IST

अंतिम सामन्याचे स्वरुप आलेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान भारताच्या महिला संघाने उत्कृष्ट गोलंदाजीनंतर दमदार फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या महिला संघाचा ९ विकेट्सने

बंगळुरु : अंतिम सामन्याचे स्वरुप आलेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान भारताच्या महिला संघाने उत्कृष्ट गोलंदाजीनंतर दमदार फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या महिला संघाचा ९ विकेट्सने फडशा पाडला आणि या दमदार विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर ३-२ असा कब्जा केला.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा निर्णायक सामना पुर्णपणे एकतर्फी ठरवताना भारताच्या महिलांनी एकहाती वर्चस्व राखले. पाहुण्या न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना न्यूझीलंडचा निर्णय त्यांच्यावर उलटवला आणि पाहुण्यांचा डाव ४१ षटकांत ११६ धावांत संपुष्टात आणला.या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी आक्रमक फटकेबाजी करताना न्यूझीलंडच्या आव्हानातली हवाच काढली. स्मृती मंधना ३ चौकार खेचून १३ धावा काढून लगेच परतल्याने भारताला तिसऱ्याच षटकांत १८ धावांवर पहिला झटका बसला. यावेळी किवी पुनरागमन करणार असे दिसत होते. मात्र थिरुष कामिनी आणि दीप्ती शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अभेद्य १०३ धावांची विजयी भागीदारी रचताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कामिनीने ७८ चेंडूत १३ चौकार ठोकताना नाबाद ६२ धावा चोपल्या. तर दीप्तीने ७८ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ४४ धावांची संयमी खेळी खेळली. किवींकडून केवळ मोर्ना नेल्सनला एकमेव बळी मिळाला.तत्पूर्वी, झुलान गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी अचूक मारा करताना प्रत्येकी २ बळी घेत किवी संघाचे कंबरडे मोडले. एकता बिस्त आणि हरमनप्रीत कौर यांनी देखील प्रत्येकी १ बळी घेत पाहुण्यांचा डाव ४१ षटकांत ११८ धावांत गुंडाळला. न्यूझीलंडकडून कर्णधार सुझी बेट्स (४२), अ‍ॅना पिटरसन (१८) आणि सोफिया डेविन (१८) यांनाचे केवळ दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले. (वृत्तसंस्था)