शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

भारताने लुटले विजयाचे सोने...

By admin | Updated: October 12, 2016 07:05 IST

अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यजमान आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय

अहमदाबाद : अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यजमान आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना बांगलादेशला ५७-२० असे लोळवले. या धमाकेदार विजयासह यजमानांनी ‘अ’ गटामध्ये ११ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.पहिला गुण बांगलादेशने जिंकल्यानंतर संपूर्ण सामन्यात भारताचा अपेक्षित दबदबा राहिला. भारतीयांनी केलेल्या जबरदस्त आक्रमणापुढे बांगलादेशचा शेवटपर्यंत निभाव लागला नाही. तब्बल ४ वेळा लोण चढवून भारतीयांनी बांगलादेशच्या आव्हानातली हवा काढली. मध्यंतरालाच भारताने २७-१० अशी १७ गुणांची एकतर्फी आघाडी सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर बांगलादेशला केवळ १० गुण मिळवता आले. तर, भारतीयांनी बांगला खेळाडूंना कबड्डीचे धडे देताना सहज बाजी मारली. गेल्या दोन सामन्यांत लौकिकानुसार खेळण्यात अपयशी ठरलेल्या अजय ठाकूरने या सामन्यात आपल जलवा दाखवताना सर्वाधिक ११ गुणांची वसुली केली. तर, प्रदीप नरवालनेदेखील खोलवर चढाया करताना ८ गुण कमावले. तसेच, सुरेंद्र नाडा आणि संदीप नरवाल यांच्या भक्कम पकडीमध्ये बांगलाचे चढाईपटू अडकत गेले. बांगलादेशकडून कर्णधार अरुदुझमन मुन्शी याने एकाकी झुंज देताना आक्रमणात ६ गुणांची कमाई केली. तर, फेरदुस शेखने ४ गुण मिळवताना चांगल्या पकडी केल्या. (वृत्तसंस्था)