शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारताने कोरियाला बरोबरीत रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:11 IST

महिला हॉकी : अंतिम लढतीपूर्वीचा सामना १-१ ने ड्रॉ

डोंघायसिटी (द. कोरिया) : आक्रमक फळीतील युवा खेळाडू लालरेमसियामी हिने नोंदविलेल्या गोलमुळे गत चॅम्पियन भारताने शनिवारी पाचव्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी महिला हॉकीच्या अखेरच्या साखळी सामन्यात कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखले. दोन्ही संघ उद्या (रविवारी) अंतिम सामन्यात पुन्हा आमने-सामने येणार आहेत.सुनीता लाक्राच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुणतालिकेत अद्याप अव्वल स्थानावर कायम आहे. भारताने जपानवर ४-१, चीनवर ३-१ आणि मलेशियावर ३-२ असा विजय नोंदविला होता. विश्व क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या कोरियाने आक्रमक खेळाने सुरुवात केली खरी; मात्र भारताने चौथ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. ड्रॅगफ्लिकर गुरजित कौरने मारलेला फ्लिक शॉट कोरियाच्या गोलकीपरने थोपवून लावला. यानंतरही भारताने कोरियाच्या बचाव फळीवर वारंवार हल्ले चढविले; पण ऐनवेळी केलेल्या चुकांमुळे गोल नोंदविण्यात यश आले नाही.दुसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाकडून सेयूल की चियोन हिने भारतीय गोलकीपर सविताला चकवित ड्रॅग फ्लिकद्वारे शानदार गोल केला. तिसºया क्वार्टरमध्ये गोल होऊ शकला नाही. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला कोरियाच्या खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरच्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. पण भारताला पेनल्टी कॉर्नर मिळताच लालरेमसियामीने गोल नोंदवित सामन्यात बरोबरी साधून दिली. ५४व्या मिनिटाला कोरियाला पुन्हा गोल नोंदविण्याची संधी मिळाली होती; पण भारतीय गोलकीपरने ती हाणून पाडली. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा