शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ध्यास सर्वोत्तमाचा! वेध टोकियो ऑलिम्पिकचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 06:49 IST

भारताने २०२८ साली क्रीडा महासत्ता बनण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवला आहे. ‘स्पोर्ट्स वॉचिंग नेशन’ ते ‘स्पोर्ट्स प्लेइंग नेशन’ ही संकल्पना कृतीत आणण्यासाठी ऑलिम्पिकमधील यश अधिक मोलाचे ठरू शकते.

भारताने २०२८ साली क्रीडा महासत्ता बनण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवला आहे. ‘स्पोर्ट्स वॉचिंग नेशन’ ते ‘स्पोर्ट्स प्लेइंग नेशन’ ही संकल्पना कृतीत आणण्यासाठी ऑलिम्पिकमधील यश अधिक मोलाचे ठरू शकते. ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा वाढीस लागते.मका हाच ध्यास डोळ्यापुढे ठेवून नववर्षात ‘टोकियो ऑलिम्पिक २०२०’कडे पाहिले जात आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या खेळाच्या या महाकुंभात १३५ कोटी लोकसंख्येचा आपला देश किती पदकांची मजल गाठेल, हे सांगणे कठीणच. मात्र त्यादृष्टीने सरकारी पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि खेळाडूंनी चालविलेली प्रयत्नांची पराकाष्ठा याचा उल्लेख व्हायलाच हवा.भारताचा ऑलिम्पिकचा इतिहास फारसा चांगला नाही. आतापर्यंत केवळ २८ पदके देशाच्या वाट्याला आली, त्यात ९ सुवर्ण आहेत. या नऊमध्ये वैयक्तिक खात्यात एकच सुवर्ण, ते म्हणजे नेमबाजीत अभिनव बिंद्राचे पदक. तरीही टोकियोत सर्वोत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करणे गैर नाही. यासाठी ज्यांच्याकडून सर्वाधिक आशा आहेत त्यात २१ व्या वर्षी रिओ ऑलिम्पिकचे रौप्य जिंकणारी पी.व्ही. सिंधू हिचे नाव सर्वांत आघाडीवर असेल. विश्व विजेतेपदाचा मुकुट स्वत:कडे खेचून सिंधूने अपेक्षा वाढवली. ऑलिम्पिक सुवर्णाची आता तिच्याकडून आशा करता येईल.एमसी मेरीकोम हे नाव विश्व बॉक्सिंगवर अधिराज्य गाजविणारे आहे. ती टोकियोत खेळेल की नाही हे निश्चित नसले तरी मेरीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत, युवा अमित पांघल यानेही विश्व बॉक्सिंगचे ऐतिहासिक रौप्य जिंकून ऑलिम्पिक पदकाची आशा पल्लवित केली आहे. शूटिंगमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा असेल. एनआरएआयने स्वत: ऑलिम्पिकमध्ये किमान पाच पदके जिंकण्याचा दावा केला आहे. सौरभ चौधरी, मनू भाकर, अपूर्वी चंदेला हे सर्व दावेदार असतील. सौरभने यंदा विश्व शूटिंग स्पर्धेत ६ सुवर्ण जिंकले. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तो पदकाचा प्रबळ दावेदार असेल. अंजुम मुदगिल आणि राही सरनोबत या क्रमश: १० मीटर एअर रायफल आणि २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात आशास्थान आहेत.भारोत्तोलनात २०१ ते २०४ किलो वजन उचलू शकल्यास मीराबाई चानूकडूनही पदकाची अपेक्षा बाळगता येईल. अ‍ॅथलेटिक्समध्ये पात्रता गाठू शकल्यास भालाफेकपटू नीरज चोप्रा, हिमा दास, दूती चंद, मोहम्मद अनस आदी खेळाडू आपापली कामगिरी उंचावू शकतील, मात्र पदकाची अपेक्षा बाळगणे घाईचे ठरेल असे दिसते. आर्चरीत दीपिका आणि अतानू दास हे भारतीय आव्हान देणार आहेत.भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने पात्रता गाठली आहे. दोन्ही संघ पदकाच्या निर्धाराने उतरणार असले तरी मार्गातील अडथळे सोपे नाहीत. टेनिसमध्ये सानिया मिर्झा-अंकिता रैना ही जोडी दुहेरीत किती मजल गाठते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.२००८ च्या बीजिंग ते २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकपर्यंत कुस्तीने भारताला एक तरी पदक जिंकून दिले आहे. यंदा कुस्तीकडून किमान दोन पदकांची आशा बाळगता येईल. सर्वांत मोठी भिस्त बजरंग पुनियावर असेल. अनेक स्पर्धांमध्ये पदक विजेता असलेल्या बजरंगची नजर यंदा सुवर्णावर राहील. याशिवाय महिला मल्ल विनेश फोगाट हिच्याकडूनही पदकाची आशा आहे.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020