शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
6
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
7
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
8
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
9
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
10
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
11
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
12
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
13
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
14
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
15
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
16
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
17
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
18
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
19
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
20
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...

डेन्मार्ककडून भारत १-४ ने पराभूत

By admin | Published: May 23, 2017 4:32 AM

भारतीय संघाला सुदीरमन कप मिश्र टीम चॅम्पियनशिपच्या पहिल्या लढतीत डेन्मार्कविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला.

गोल्ड कोस्ट : भारतीय संघाला सुदीरमन कप मिश्र टीम चॅम्पियनशिपच्या पहिल्या लढतीत डेन्मार्कविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला. स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू विजय मिळवणारी एकमेव खेळाडू ठरली. दोनदा उपविजेता ठरलेल्या डेन्मार्क संघाविरुद्ध भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मिश्र दुहेरी, पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरी अशा तीन लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघ सुरुवातीलाच पाच सामन्यांच्या लढतीत ०-३ ने पिछाडीवर होता. लढतीचा प्रारंभ अश्विनी पोनप्पा व युवा सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीने केला. त्यांना जोकिम फिश्न नील्सन व ख्रिस्टिना पेडरसन या लंडन आॅलिम्पिकमधील कांस्यपदकविजेत्या जोडीविरुद्ध संघर्षपूर्ण खेळानंतर १५-२१, २१-१६, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेला खेळाडू अजय जयरामकडून भारतीय संघाला मोठी आशा होती. त्याने अलीकडेच मलेशिया ओपनमध्ये व्हिक्टर एक्सेलसेनचा पराभव केला होता, पण येथे जयरामला केवळ २७ मिनिटांमध्ये १२-२१, ७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारतीय संघ ०-२ ने पिछाडीवर पडला. पुरुष दुहेरीमध्ये मनू अत्री व बी. सुमित रेड्डी यांना माथियास बोए व कार्स्टन मोगेनसन या माजी आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या जोडीविरुद्ध ३३ मिनिटांच्या खेळात १७-२१, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या सिंधूने त्यानंतर महिला एकेरीमध्ये लिने कार्सफेल्टचा ३२ मिनिटांमध्ये २१-१८, २१-१६ ने पराभव करीत क्लीनस्वीपची नामुष्की टाळली. पाचव्या व अंतिम लढतीत अश्विनी व एन. सिक्की रेड्डी या महिला दुहेरीच्या जोडीने कडवा संघर्ष केला, पण अखेर त्यांना कामिला राईट जुल व ख्रिस्टिना या आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या जोडीविरुद्ध २१-१८, १५-२१, २१-२३ ने पराभव स्वीकारावा लागला. डेन्मार्कने या लढतीत ४-१ ने सरशी साधताना वर्चस्व गाजवले. भारताला पुढच्या लढतीत माजी चॅम्पियन इंडोनेशियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.