शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

बेल्जियमकडून भारत पराभूत

By admin | Updated: June 14, 2016 03:59 IST

बेल्जियमने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना सोमवारी ३६ व्या हीरो चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा २-१ ने पराभव केला.

लंडन : बेल्जियमने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना सोमवारी ३६ व्या हीरो चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा २-१ ने पराभव केला. गेल्या लढतीत यजमान ब्रिटनचा पराभव करीत आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाची या स्पर्धेत बेल्जियमविरुद्धची कामगिरी चांगली झाली, पण बेल्जियमच्या मजबूत बचावाने भारताचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.या युरोपियन संघाने २०११ पासून भारतावर वर्चस्व गाजवले आहे. यावेळीही बेल्जियमने वर्चस्व कायम राखले. सातवे मानांकन असलेल्या भारताने यापूर्वीच्या लढतीत ब्रिटनचा २-१ ने पराभव केला होता, तर आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीला ३-३ ने बरोबरीत रोखले. बेल्जियम व भारताच्या खात्यावर समान चार गुण आहेत. आॅस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत तीन सामन्यानंतर सात गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ब्रिटन, भारत आणि बेल्जियम हे संघ आहेत. बेल्जियमचा बचाव भेदण्याचे भारतापुढे कडवे आव्हान होते. बेल्जियमने या लढतीत आठ पेनल्टी कॉर्नर मिळवले, तर भारताला केवळ एक पेनल्टी कॉर्नर मिळवता आला. बेल्जियमतर्फे अलेक्झांडर हेन्ड्रिक्सने २५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तोपर्यंत बेल्जियमने चार पेनल्टी कॉर्नर मिळवले होते. भारताने त्यानंतर आक्रमक खेळ केला. ३० व्या मिनिटाला देवेंद्र वाल्मिकीने मैदानी गोल नोंदवत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. एस. व्ही. सुनीलची गोल करण्याची संधी हुकल्यानंतर रिबाऊंडवर वाल्मिकीने शानदार गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत उभय संघ १-१ ने बरोबरीत होते. तिसऱ्या क्वार्टरमध्ये उभय संघांनी संघर्षपूर्ण खेळ केला. जेरोम ट्युयेन्सने ४४ व्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. बेल्जियमने ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. (वृत्तसंस्था)