शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

India at Commonwealth Games 2018: सुवर्ण हॅट्ट्रिकसाठी सुशील कुमार सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 16:33 IST

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तर सुशीलने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. 2010 साली नवी दिल्ली आणि 2014 साली ग्लासगो येथे झालेल्या दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सोनेरी यश मिळवले आहे. त्यामुळे आता गोल्डकोस्ट येथे सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सुशील सज्ज झाला असेल.

ठळक मुद्देनरसिंगच्या आहारात सुशीलच्या सांगण्यावरून काही जणांनी उत्तेजक मिळले, असा आरोप झाला होता. याप्रकरणात सुशीलच्या नावाला  बट्टा लागला होता.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे यावेळी कोणता खेळाडू कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष लागून राहीलेले असेल. यामध्ये सर्वात अग्रस्थानी असेल तो कुस्तीपटू सुशील कुमार.

भारताला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत दोन पदके जिंकवून देणारा एकमेव क्रीडापटू, अशी सुशील कुमारची ओळख आहे. बीजिंग आणि लंडन या दोन ऑलिम्पिकमध्ये सुशीलने पदकं जिंकली आहेत. त्याचबरोबर खाशाबा जाधव यांच्यानंतर कुस्ती या खेळाला जर कुणी वलय मिळवून दिले असेल तर ते सुशीलनेच. कारण 2012 साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतातील बरीच मुलं कुस्तीकडे वळाली.

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तर सुशीलने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. 2010 साली नवी दिल्ली आणि 2014 साली ग्लासगो येथे झालेल्या दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सोनेरी यश मिळवले आहे. त्यामुळे आता गोल्डकोस्ट येथे सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सुशील सज्ज झाला असेल.

सुशील काही वर्षांपूर्वी 66 किलो वजनी गटामध्ये खेळत होता. कालांतराने तो 74 किलो वजनी गटामध्ये खेळायला लागला. 74 किलो वजनी गटामध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. या गटातून खेळताना त्याने राष्ट्रकुल अजिंक्यपद कुस्ती आणि राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली आहे.

नरसिंग यादव प्रकरणरिओमध्ये 2016 साली झालेल्या ऑलिम्पिकसाठी एकाच गटातून सुशील आणि नरसिंग यांना संधी मिळाली होती. पण दोघांपैकी एकालाच पाठवायचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये नरसिंगने बाजी मारली. त्यानंतर नरसिंगच्या आहारात सुशीलच्या सांगण्यावरून काही जणांनी उत्तेजक मिळले, असा आरोप झाला होता. याप्रकरणात सुशीलच्या नावाला  बट्टा लागला होता. त्यानंतर मात्र कोणतीही मोठी स्पर्धा सुशील अजूनपर्यंत खेळलेला नाही.

राष्ट्रीय स्पर्धेतील वादंगराष्ट्रीय स्पर्धेत सुशीलने सुवर्णपदक जिंकले खरे, पण याबाबत बराच वाद झाला. कारण या स्पर्धेत सुशीलसमोर असलेल्या सर्व कुस्तीपटूंनी माघार घेतली होती. या कुस्तीपटूंनी माघार घेतली होती, की त्यांना माघार घ्यायला लावली होती, याविषयावर बरीच चर्चा झाली आहे.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Sushil Kumarसुशील कुमार