शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

 India at Commonwealth Games 2018: सर्वोत्तम कामगिरीसाठी सिंधू सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 18:08 IST

आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे.

ठळक मुद्देसराव करत असताना काही दिवसांपूर्वी सिंधूच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे सिंधू राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती.

सध्याच्या घडीला भारतीय बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे ती पी.व्ही.सिंधू. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावल्यावर सिंधूला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने सायना नेहवाललाही मागे टाकले आहे.

आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे.

पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधू सराव करत आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत सिंधूला स्पेनच्या कारोलिन मरिनकडून पराभव पत्करावा लागला होता. या अंतिम सामन्यात सिंधूने मरिनला अनपेक्षित लढत दिली होती. पण सिंधूला सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नव्हती. पण सिंधूची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये सिंधूने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे.

इंडियन खुल्या स्पर्धेत सिंधूने ऑलिम्पिकच्या पराभवाचा बदला घेतला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने मरिनला पराभूत केले. त्यानंतर काही दिवसांतच सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर कोरिया खुली स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली होती.

सुवर्णपदकाचा मार्गात दुखापतीचा ससेमिरासराव करत असताना काही दिवसांपूर्वी सिंधूच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे सिंधू राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. पण सिंधू या दुखापतीतून सावरली असल्याचे म्हटले जात असले, तर तिच्या सुवर्णपदकाच्या मार्गात दुखापतीचा ससेमिरा असेल, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८PV Sindhuपी. व्ही. सिंधू