शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

भारताची न्यूझीलंडवर मात

By admin | Updated: May 29, 2017 00:47 IST

भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमीची भेदक गोलंदाजी तसेच कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीने विद्यमान विजेत्या

लंडन : भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमीची भेदक गोलंदाजी तसेच कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीने विद्यमान विजेत्या भारतीय संघाने पावसाचा व्यत्यय आलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात आज येथे न्यूझीलंड संघावर डवकर्थ लुईस नियमाच्या आधारे ४५ धावांनी मात केली.भुवनेश्वर कुमार आणि शमी यांच्या वेगवान आणि अचूक टप्प्यावरील स्विंग गोलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडला ३८.४ षटकांत १८९ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भुवनेश्वर व शमी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताने ३ बाद १२९ धावा केल्या. या धावसंख्येवरच पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवावा लागला. त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. अशा प्रकारे भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा कोहली ५२ आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी १७ धावांवर खेळत होते. सलामीवीर शिखर धवनने ४0 धावा केल्या.तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडतर्फे केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. त्यात सलामीवीर ल्युक रोंचीने सर्वांधिक ६६ धावांची खेळी केली तर अष्टपैलू जेम्स नीशाम ४६ धावा काढून नाबाद राहिला. या लढतीत उभय संघाचे प्रत्येकी १३ खेळाडू खेळू शकतात, पण केवळ ११ खेळाडूंना फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची संधी आहे. न्यूझीलंडसाठी नाणेफेक वगळता काहीच सकारात्मक घडले नाही. विराट कोहलीने शमी व हार्दिक पांड्या यांना नव्या चेंडूने मारा करण्याची संधी दिली. पांड्याला छाप सोडता आली नाही, पण शमीने मात्र सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. रोंचीने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्राही स्वीकारला होता. शमीने वैयक्तिक दुसऱ्या षटकात अपेक्षेपेक्षा अधिक उसळलेल्या चेंडूवर मार्टिन गुप्तीलला (९) मिड आॅफवर झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन (८) व नील ब्रुम (०) यांना सलग चेंडूंवर माघारी परतवले. रोंची वैयक्तिक २६ धावांवर असताना बुमराहच्या गोलंदाजीवर झेल अश्विनला टिपण्यात अपयश आले. पुढच्या षटकात रोंचीने शमीच्या गोलंदाजीवर दोन चौकार व मिडविकेटला षटकार ठोकला. शमीने या षटकात विलियम्सन व ब्रुम यांना तंबूचा मार्ग दाखविला. धावफलकन्यूझीलंड : मार्टिन गुप्टील झे. भुवनेश्वर गो. शमी ०९, ल्युक रोंची त्रि. गो. जडेजा ६६, केन विलियम्सन झे. रहाणे गो. शमी ०८, नील ब्रुम झे. धोनी गो. शमी ००, कोरी अँडरसन त्रि. गो. भुवनेश्वर १३, मिशेल सँटनर झे. जडेजा गो. अश्विन १२, कोलिन डी ग्रँडहोम यष्टिचित धोनी गो. जडेजा ०४, जेम्स नीशाम नाबाद ४६, अ‍ॅडम मिल्ने झे. धोनी गो. यादव ०९, टीम साऊदी त्रि. गो. भुवनेश्वर ०४, ट्रेंट बोल्ट झे. शमी गो. भुवनेश्वर ०९. अवांतर (९). एकूण ३८.४ षटकांत सर्वबाद १८९. गोलंदाजी : शमी ८-०-४७-३, पांड्या ६-०-४९-०, बुमराह ४-०-१४-०, भुवनेश्वर ६.४-१-२८-३, जडेजा ४-०-८-२, अश्विन ६-०-३२-१, यादव ४-०-११-१.भारत : अजिंक्य रहाणे झे. बोल्ट गो. साउथी ७, शिखर धवन झे. अँडरसन गो. निशाम ४0, विराट कोहली नाबाद ५२, दिनेश कार्तिक झे. सँटेनर गो. बोल्ट 0, महेंद्रसिंह धोनी नाबाद १७. अवांतर : १३. एकूण : २६ षटकांत ३ बाद १२९. गोलंदाजी : साउथी ७-0-३७-१, बोल्ट ७-१-३४-१, मिल्ने ४-0-२0-0, निशाम ३-0-११-१, ग्रँडहोम ५-0-२२-0.धोनीला संगकाराचा विक्रम मोडण्याची संधीमहेंद्रसिंग धोनीला श्रीलंकेचा कुमार संगकाराला पिछाडीवर सोडत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम यष्टिरक्षक होण्याची संधी आहे. श्रीलंकेचा कुमार संगकारा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वांत यशस्वी यष्टिरक्षक आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक ३३ बळी घेतले आहेत, पण भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी त्याला आव्हान देत असल्याचे निदर्शनास येते. धोनीने आतापर्यंत ११ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत. त्यात ११ झेल व ४ यष्टिचितचा समावेश आहे. संगकाराने २२ सामन्यांत ३३ बळींची नोंद केली आहे. त्यात २८ झेल व पाच यष्टिचितचा समावेश आहे. एम.एस. धोनीला संगकाराचा विक्रम मोडण्यासाठी १९ बळींची गरज आहे.जर धोनीने अशी कामगिरी केली तर तो या स्पर्धेतील सर्वांत यशस्वी यष्टिरक्षक ठरेल. सर्वाधिक बळी घेणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये संगकारानंतर अ‍ॅडम गिलख्रिस्टचा (२५ बळी, २३ झेल, २ यष्टिचित) क्रमांक आहे पण, गिलख्रिस्टने यापूर्वीच निवृत्ती स्वीकारली आहे.