विशाखापट्टणम : भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्नात असणाऱ्या सलामीवीर शिखर धवनचे शतक आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीची हॅट्ट्रिक या बळावर भारत ब संघाने देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी पहिल्या सामन्यात भारत अ संघावर २३ धावांनी विजय मिळवला.बऱ्याच काळापासून सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या शिखर धवनने १२२ चेंडूंत १३ चौकार आणि ३ षटकारांसह १२८ धावा केल्या. त्याने कर्णधार पार्थिव पटेल (५0) याच्या साथीने सलामीसाठी ९३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर शिखरने इशांक जग्गी (५३) याच्याबरोबर तिसऱ्या गड्यासाठी १0३ आणि हरप्रीतसिंग (२९) याला साथीला घेत चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी केली. शिखरच्या शतकी खेळीच्या बळावर भारत ब संघाने ५0 षटकांत ८ बाद ३२७ धावा केल्या. भारत अ कडून सिद्धार्थ कौल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५९ धावांत ५ गडी बाद केले.त्यानंतर धवल कुलकर्णीने घेतलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारत ब संघाने प्रत्युत्तरात उतरलेल्या भारत अ संघाला ४८.२ षटकांत ३0४ धावांत रोखले. भारत अ संघाकडून अंबाती रायुडूने ९२ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह सर्वाधिक ९२ धावा केल्या. दीपक हुडाने ४६, मनोज तिवारीने ३७, मयंक अग्रवालने ३४ आणि कृणाल पंड्याने ३१ धावांचे योगदान दिले. हुडाने आक्रमक पवित्रा अवलंबला होता. त्याला धवल कुलकर्णीने बाद करीत भारत ब संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. धवल कुलकर्णीने ६४ धावांत ३ गडी बाद केले. अक्षय कर्णीवारने ६0 धावांत ३ आणि अक्षर पटेल व कुलवंत खजुरिया यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. या विजयामुळे भारत ब संघाचे ४ गुण झाले आहेत. या स्पर्धेतील तिसरा संघ विजय हजारे करंडक जिंकणारा तमिळनाडूचा संघ आहे.संक्षिप्त धावफलकभारत ब : ५0 षटकांत ८ बाद ३२७.(शिखर धवन १२८, पार्थिव पटेल ५0, इशांक जग्गी ५३. सिद्धार्थ कौल ५/५९, कृणाल पंड्या २/४१).भारत अ संघ : ४८.२ षटकांत सर्वबाद ३0४. (अंबाती रायुडू ९२, दीपक हुडा ४६, मनोज तिवारी ३७, मयंक अग्रवाल ३४, कृणाल पंड्या ३१, ऋषभ पंत २0. धवल कुलकर्णी ३/६४, अक्षय कर्णीवार ३/६0, अक्षर पटेल २/५४, कुलवंत खजुरिया २/५४)
भारत ‘ब’ची अ संघावर मात
By admin | Updated: March 26, 2017 00:53 IST