शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Big Blow : हिमा दासचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न तुटले; भारताच्या 4 बाय 400 मीटर महिला रिले संघाला अपयश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 10:04 IST

Tokyo Olympics 2020 : भारताच्या 4 बाय 400 मीटर रिले महिला संघाला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात अपयश आले.

Tokyo Olympics 2020 : भारताच्या 4 बाय 400 मीटर रिले महिला संघाला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात अपयश आले. बहामा संघानं भारतीय महिला रिले संघाचे हे स्वप्न धुळीस मिळवले. बहामाच्या महिला रिले संघानं ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत 3 मिनिटे 29.40 सेकंदाची वेळ नोंदवली अन् भारतीय संघापेक्षा ही वेळ 0.02 सेकंद जलद ठरली. ( Bahamas pushed Indian women 4x400m relay team out of Tokyo 2020 with a performance of 3:29.40s, 0.02 faster than Indian performance). हा भारतासाठीच नव्हे तर सुवर्णकन्या हिमा दास ( Hima Das) हिच्यासाठी मोठा झटका आहे. आता हिमाला कोणत्याच क्रीडा प्रकारातून टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळता येणार नाही.

अर्चना सुसींद्रन, हिमा दास, एस धनलक्ष्मी आणि द्युती चंद या महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले टीमला क्वालिफायसाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. संघाला थेट प्रवेश न मिळाल्यास रोड टू टोक्यो रँकिंगनुसार त्यांना ऑलिम्पिकचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. पण, आता तेही शक्य नाही.   हिमा दासचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर जाणे निश्चित आहे. शनिवारी 100 मीटर हिट शर्यतीत तिला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. हिमानं सोमवारी 200 मीटर फायनल स्पर्धेत सहभाग घेऊन ऑलिम्पिक तिकीट पटकावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक पात्रतेच्या अखेरच्या इव्हेंटमध्ये भारताची थाळीफेकपटू सीमा पूनियानं टोक्योचं तिकीट पटकावलं. तिनं राष्ट्रीय आंतर राज्य स्पर्धेत 63.72 मीटर लांब थाळी फेक करून सुवर्णपदक जिंकले. 37 वर्षीय पूनियानं 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि 2018च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.  

 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Hima Dasहिमा दास