भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अरशद नदीम पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच ते एका स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. जपानच्या टोकियोमध्ये आयोजित जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत या दोघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळेल. १३ ते ३१ सप्टेंबर या कालावधी पार पडणाऱ्या स्पर्धेत नीरज चोप्रा १९ सदस्यीय भारतीय ताफ्याचे नेतृत्व करणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानी भालाफेकपटूला पात्रता सिद्ध केली, नीरज चोप्राला मात्र थेट एन्ट्री; कारण...
भारताचा २७ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा हा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील गत चॅम्पियन आहे. याच जोरावर त्याला या स्पर्धेत थेट एन्ट्री मिळाली आहे. दुसरीकडे २८ वर्षीय पाकिस्तानी खेळाडूनं मे महिन्यात दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत ८६.४० मीटर थ्रोसह गोल्डन कामगिरीसह या स्पर्धेच तिकीट मिळवलं आहे.
हिशोब चुकता करण्याची संधी
नीरज चोप्रा हा मागील काही स्पर्धेत सातत्याने ८५.५० मीटर पेक्षा लांब भाला फेकताना दिसला आहे. यावेळी पुन्हा तो ९० पारचं लक्ष्य गाठत सुवर्ण कामगिरीसह या स्पर्धेतील बादशाहत कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. एवढेच नाही तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फायलमधील हिशोब चुकता करण्याची संधीही त्याच्याकडे आहे. याउलट पाकिस्तानचा स्टार खेळाडू पिंडरीच्या दुखापतीतून सावरून मैदानात उतरणार आहे. जुलैमध्ये इंग्लंडमध्ये पार पडलेल्या शस्त्रक्रियेनंतर स्वत:ला सिद्ध करण्याचे मोठं चॅलेंज त्याच्यासमोर असेल.
या स्पर्धेचा प्रबळ दावेदार कोण?
नीरज चोप्रानं आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखले असले तरी जागतिक स्पर्धेत नंबर वन ठरण्यासाठी त्याला आणखी जोर लावावा लागेल. कारण या स्पर्धेत पाकच्या नदीमपेक्षाही त्याच्यासमोर सर्वात मोठे चॅलेंज कुणाचे असेल तर ते म्हणजे जर्मनीच्या ज्युलियन वेबर याचे. यंदाच्या हंगामात जर्मनीच्या भालाफेकपटूनं तीन वेळा ९० मीटर पेक्षा अधिक अंतर भाला फेकला आहे. नीरजनं याचवर्षी दोहा डायमंड लीगमध्ये ९० पारचा आकडा गाठला होता. ९०.२३ मीटर थ्रोनंतर नीरजच्या कामगिरीत सातत्य दिसले, पण नव्वदीचा आकडा गाठण्यात तो कमी पडला. यात सुधारणा करून तो सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल.