शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : लहरा दो...! आशियाई स्पर्धेत भारताने मारला मेडल्सचा 'पंच', 'नारी शक्ती'चा डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 14:13 IST

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे.

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय शिलेदारांनी पदकाचे खाते उघडले आहे. भारताने कमी कालावधीत दोन पदकांवर आपले नाव कोरले. ही दोन्ही रौप्य पदके असून यानंतर लगेचच भारतीय खेळाडूंनी पदकांचा 'पंच' मारला. नेमबाजीत भारताने दिवसातील पहिले पदक जिंकले. तर उर्वरित ३ पदके रोईंग या खेळात जिंकली. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीत भारताने रौप्यपदक जिंकले. दुसरे रौप्य पदक रोईंगमध्ये जिंकले, जिथे भारतीय पुरुषांनी लाइटवेट प्रकारात पदक जिंकण्याचा कारनामा केला. याशिवाय रोईंगमध्ये भारतीय खेळाडूंना एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकण्यात यश आले. खरं तर भारताने नेमबाजीतही दिवसातील पाचवे पदक जिंकले.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजीतून आपल्या पदकाचे खाते उघडले. नेमबाजीत भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले. तिघांनी मिळून १८८६ गुण मिळवले, ज्यामध्ये रमिताने ६३१.९ गुण मिळवले. मेहुलीने ६३०.८ तर आशीला ६२३.३ गुण मिळवण्यात यश आले. 

१२ हजारहून अधिक खेळाडूंचा सहभाग २०२३ च्या आशियाई स्पर्धेत भारताचे ६५५ शिलेदार रिंगणात आहेत. ६५५ भारतीय खेळाडू ४० विविध खेळांमध्ये देशाचे प्रधिनिधित्व करत आहेत. यापूर्वी जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ५७२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. लक्षणीय बाब म्हणजे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४५ देशांतील १२ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. खरं तर यापूर्वी २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही क्रिकेट हा आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग होता, परंतु बीसीसीआयने आपला संघ पाठवला नव्हता. मात्र, यावेळी बीसीसीआयने यावेळी आपले पुरुष आणि महिला दोन्ही संघ पाठवले आहेत.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३IndiaभारतSilverचांदी