नवी दिल्ली : प्रथमच इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेला सनरायजर्स हैदराबादचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला भारतीय परिस्थिती त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी पोषक असेल असे वाटते. विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी येथेही पुढे सुरू ठेवू, अशी त्याला आशा आहे. न्यूझीलंडच्या या गोलंदाजाने विश्वचषक स्पर्धेत २२ बळी मिळवले आहेत. हैदराबादने त्याला तीन कोटी ८० लाखांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. बोल्ट म्हणाला, ‘मी भारतात काही सामने खेळलो आहे. येथील खेळपट्ट्या संथ आहेत तसेच सामने रात्री होणार असल्याने हवेत थोडा गारवा असेल.
मला स्विंगसाठी मदत मिळेल : बोल्ट
By admin | Updated: April 7, 2015 23:29 IST