शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

आॅलिम्पिक पात्रतेची मला खात्री आहे

By admin | Updated: November 23, 2015 00:29 IST

दुखापतीनंतर मी स्वत:ला सावरले असून, पूर्वीप्रमाणे जोमाने सराव सुरू झाला आहे. आॅलिम्पिक पात्रता निश्चित करण्यासाठी ६० मीटरची फेक आवश्यक असून

रोहित नाईक,  विरारदुखापतीनंतर मी स्वत:ला सावरले असून, पूर्वीप्रमाणे जोमाने सराव सुरू झाला आहे. आॅलिम्पिक पात्रता निश्चित करण्यासाठी ६० मीटरची फेक आवश्यक असून, मी अनेकदा याहून अधिक मीटरची फेक केली असल्याने आॅलिम्पिक पात्रतेची मला खात्री आहे. त्यानुसार आगामी काही स्पर्धांकडे लक्ष केंद्रित करून स्वत:ला सज्ज केले आहे, असे भारताची अव्वल थाळीफेकपटू कृष्णा पुनिया हिने सांगितले.रविवारी झालेल्या वसई - विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेची ब्रँड अ‍ॅम्बॅसडर असलेल्या पुनियाने यावेळी ‘लोकमत’शी संवाद साधला. आॅलिम्पिकच्या तयारीसाठी सरकारने सुरू केलेल्या ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’ (टॉप) योजनेमुळे ज्या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आहे, त्यांना फायदा आहेच; शिवाय मिळणाऱ्या मदतीमुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मला शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे मी ‘टॉप’साठी अर्ज केला नव्हता. जोपर्यंत मला स्वत:ला माझ्या तयारीबाबत आत्मविश्वास मिळत नाही, तोपर्यंत मी यासाठी पुढे जाणार नाही. कारण हा सरकारचा पैसा असून, तो उगाच वाया घालवण्याची माझी इच्छा नाही, असेही पुनियाने सांगितले.आॅलिम्पिक तयारीविषयी पुनियाने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर माझ्या तंदुरुस्तीत वाढ झाली असून, गेल्या दहा दिवसांपासून माझी फेकही उत्तम होत आहे. अजूनपर्यंत तरी सरावामध्ये कोणतीच अडचण आली नसल्याने आत्मविश्वास वाढला आहे आणि या जोरावर मी निश्चितच आॅलिम्पिकसाठी पात्र ठरेन. त्याचप्रमाणे परदेशी वातावरण व भारतीय वातावरण यामध्ये खूप फरक असतो. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळण्याची संधी द्यावी. कॉमनवेल्थ, आशियाई यांसारख्या जागतिक स्पर्धांतून भारतीय खेळाडूंना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल, असेही पुनिया म्हणाली. नुकतीच विश्व डोपिंगविरोधी संस्थेने (वाडा) रशियन डोपिंगविरोधी संस्थेला निलंबित केले. याबाबतीत पुनिया म्हणाली की, या निर्णयाने इतर देशांना धडा मिळेल. तसेच जर रशियाने नमुने नष्ट केले असतील तर ‘वाडा’चा हा निर्णय नक्कीच चांगला आहे. यामुळे जे खेळाडू प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, त्यांना एकप्रकारे न्याय मिळाला आहे.