शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Bajrang punia मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींना परत करतो! कुस्तीपटू बजरंग पुनियाचा धक्कादायक निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 17:05 IST

भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली होती.

''मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है,'' असे ट्विट करून बजरंग पुनियाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. यात भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला. संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी ढसाढसा रडली होती. आज बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत देत असल्याचे जाहीर केले. 

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाने लिहिले की, आशा करतो की तुम्ही बरे असाल. तुम्ही देशाची सेवा करण्यात व्यग्र आहात. तरीही तुमचं लक्ष आमच्या कुस्तीकडे वळवण्याचा माझा प्रयत्न आहे. जानेवारीत आम्ही बृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत उपोषणाला बसलो होतो, हे तर तुम्हाला माहीत असेलच. महिला कुस्तीपटूंनी सुरू केलेल्या आंदोलनात मी पण सहभागी होतो. आश्वासनानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले, परंतु ३ महिने काहिच न झाल्याने आम्ही पुन्हा आंदोलनाला बसलो.

''आमचे ते आंदोलन ४० दिवस चालले होते. तेव्हा दिल्ली पोलिसांनी आम्हाला बळाचा वापर करून त्रास दिला. आम्हाला केवळ आश्वासनं मिळाली. २१ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत बृजभूषणने पुन्हा महासंघावर कब्जा केला. महिला कुस्तीपटूंना असे अपमानित केले जात असताना हा पुरस्कार घेऊन मी जगू शकत नाही. त्यामुळे ही हा पुरस्कार परत करतोय ,'' असेही त्याने लिहिले. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021