शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हैदराबादच्या विजयाचा ‘सन’राईज

By admin | Updated: May 7, 2016 04:50 IST

मुस्तफिजुर रहमान आणि भुवनेश्वर कुमार यांच्या धारदार गोलंदाजीनंतर शिखर धवन याने केलेल्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग

हैदराबाद : मुस्तफिजुर रहमान आणि भुवनेश्वर कुमार यांच्या धारदार गोलंदाजीनंतर शिखर धवन याने केलेल्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग सामन्यात शुक्रवारी गुजरात लायन्सचा ५ गडी राखून पराभव केला.गुजरातला १२६ धावांत रोखल्यानंतर शिखर धवन (नाबाद ४७) याच्या झुंजार फलंदाजीच्या बळावर सनरायजर्सने १९ षटकांत ५ बाद १२९ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. धवनने त्याच्या ४0 चेंडूंच्या खेळीत ६ चौकार मारले. लायन्सकडून धवल कुलकर्णीने १७ धावांत २ गडी बाद केले. ड्वेन ब्राव्हो यानेही १४ धावांत २ गडी बाद केले; परंतु हे दोघे संघाला सलग तिसऱ्या पराभवापासून रोखू शकले नाहीत. सनरायजर्सने २१ एप्रिल रोजी राजकोट येथे लायन्सविरुद्ध झालेला सामनाही १0 गडी राखून जिंकला होता. सनरायजर्सचे आठ सामन्यात पाच विजयासह १0 गुण झाले आहेत तर सलग तिसऱ्या पराभवानंतर लायन्सचे १0 सामन्यात सहा विजयासह १२ गुण आहेत.विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्सला वॉर्नरने (१७ चेंडूंत २४ धावा) वेगवान सुरुवात करुन दिली. वॉर्नरने प्रवीणला चौकार ठोकल्यानंतर प्रदीप सांगवान याला पुढील षटकात २ षटकार मारला; परंतु धवल कुलकर्णीच्या चेंडूवर तो प्रवीणच्या हाती झेल देऊन बसला. केन विलियम्सन (६) याने कुलकर्णीला चौकार मारत धावांचे खाते उघडले; परंतु तो प्रवीणच्या गोलंदाजीवर ड्वेन स्मिथच्या हाती झेल देऊन बाद झाला. सनरायजर्सच्या ५0 धावा नवव्या षटकात पूर्ण झाल्या. मोइजेस हेनरिक्सदेखील १६ चेंडूंत १४ धावा काढून तंबूत परतला. तथापि, धवनने एक बाजू लावून धरली. आयपीएल ९ मध्ये पहिला सामना खेळणाऱ्या युवराज १४ चेंडूंत ५ धावा काढून धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने सनरायजर्सची स्थिती ४ बाद ८१ अशी झाली होती.सनरायजर्सला अखेरच्या ५ षटकात विजयासाठी ३६ धावांची होती. धवनने कुलकर्णीला तर दीपक हुडाने कौशिकला चौकार मारला. ब्राव्होने हुडाला कार्तिकरवी झेलबाद करीत लायन्सच्या आशा उंचावल्या. तथापि, नमन ओझाने १९ व्या षटकात प्रवीणला चौकार मारला आणि धवनने या षटकातील अखेरच्या २ चेंडूंवर चौकार मारत सनरायजर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.तत्पूर्वी, मुस्तफिजुर रेहमान आणि भुवनेश्वर कुमार यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सला ६ बाद १२६ धावसंख्येवर रोखले होते.मुस्तफिजुर रेहमान (१६ धावांत २) आणि भुवनेश्वर कुमार (२८ धावांत २) यांनी गुजरात लायन्सला नियमित अंतराने धक्के दिले, तर आशिष नेहरा (४ षटकांत २३) याने किफायती गोलंदाजी करताना गुजरातवर दबाव कायम ठेवला. बरिंदर सरन (२१ धावांत १ गडी) आणि मोइजेस हेनरिक्स (२४ धावांत १ बळी) यांनीदेखील चांगली गोलंदाजी केली.गुजरातकडून अ‍ॅरोन फिंचने ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ५१ धावांची खेळी करताना गुजरात लायन्सला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. मात्र, अन्य फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाही. (वृत्तसंस्था)धावफलकगुजरात लायन्स : ड्वेन स्मिथ झे. मुस्तफिझुर रहमान गो. भुवनेश्वरकुमार १, ब्रँडन मॅक्युलम झे. वॉर्नर गो. हेन्रीक्स ७, सुरेश रैना झे. आणि गो. भुवनेश्वरकुमार २०, दिनेश कार्तिक झे. विल्यमसन गो. मुस्तफिझुर रहमान ०, अ‍ॅरोन फिंच नाबाद ५१, ड्वेन ब्राव्हो झे. (बदली खेळाडू) व्ही. शंकर गो. सरन १८, रवींद्र जडेजा झे. भुवनेश्वरकुमार गो. मुस्तफिझुर रहमान १८, प्रवीणकुमार नाबाद ६. एकूण २० षटकांत ६ बाद १२६ गोलंदाजी : ्भुवनेश्वर कुमार ४-०-२८-२, आशिष नेहरा ४-१-२३-०, मुस्तफिझुर रहमान ४-०-१७-२, बलिंदर सरन ३-०-२१-१, हेन्रीक्स ३-०-२४-१, युवराज सिंग २-०-१३-०सनरायझर्स हैदराबाद : डेव्हीड वॉर्नर झे. प्रविण कुमार गो. कुलकर्णी २४, शिखर धवन नाबाद ४७, केन विल्यमसन झे. स्मिथ गो. प्रविणकुमार ६, हेन्रीक्स झे. कार्तिक गो. ब्राव्हो १४, युवराज सिंग झे संगवान गो. कुलकर्णी ५, हुडा झे. कार्तिक गो. ब्राव्हो १८, नमन ओझा नाबाद ९एकूण १९ षटकांत ५ बाद १२९.गोलंदाजी : प्रविणकुमार ४-०-२८-१, संगवान २-०-२८-०, कुलकर्णी ४-१-१७-२, कौशिक ४-०-२५-०, जडेजा २-०-१४-०, ब्राव्हो ३-०-१४-२