शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

हुश्शऽऽ मुंबई जिंकली रे...

By admin | Updated: April 26, 2015 01:40 IST

पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या कमजोर ठरलेल्या गोलंदाजांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान २० धावांनी परतावून लावत यंदाच्या आयपीएलमधील दुसरा विजय मिळवला.

मलिंगाचा निर्णायक मारा : सिमन्सची अर्धशतकी खेळी; सनरायझर्स २० धावांनी पराभूतरोहित नाईक ल्ल मुंबईपराभवाच्या गर्तेत सापडलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या कमजोर ठरलेल्या गोलंदाजांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान २० धावांनी परतावून लावत यंदाच्या आयपीएलमधील दुसरा विजय मिळवला. मिचेल मॅक्क्लेनघनने (३/२०) हैदराबादला जखडवून ठेवल्यानंतर शेवटच्या क्षणी लसिथ मलिंगाने (४/२३) केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने बाजी मारली. सात सामन्यातून दुसरा विजय मिळवलेले मुंबई इंडियन्स ४ गुणांसह तळाच्या स्थानी कायम आहेत.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर लैंडल सिमेन्स (५१), कर्णधार रोहित शर्मा (२४) आणि किएरॉन पोलार्ड (३३) यांच्या जोरावर मुंबईने निर्धारीत २० षटकांत ८ बाद १५७ अशी समाधानकारक मजल मारली. यावेळी पुन्हा एकदा मुंबई पराभव ओढावून घेणार अशी चिन्हे दिसत होती. हैदराबादने देखील झोकात सुरुवात करताना मुंबईला चिंतेत पाडले होते. सलामीवीर शिखर धवनने मुंबईची गोलंदाजी फोडून काढताना तुफानी फटकेबाजी केली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला धडाकेबाज डेव्हीड वॉर्नर मात्र संथपणे खेळत होता. मलिंगाने वॉर्नरला बाद करुन ही जोडी फोडली खरी, मात्र तो पर्यंत सनरायझर्सच्या ५ षटकांत ४५ धावा फलकावर लागल्या होत्या. यानंतर मॅक्क्लेनघनने धवनला बाद करताना मुंबईच्या मार्गातील मुख्य अडसर दूर करीत हैदराबादची २ बाद ५२ अशी अवस्था केली. त्याचवेळी लोकेश राहूल (२५) आणि रवी बोपारा (२३) यांनी ३६ धावांची भागीदारी करीत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा मॅक्क्लेनघनने मुंबईला मोठे यश मिळवून देताना बोपाराला परतवले. यानंतर सामन्यातील खरे नाट्य घडले. मलिंगाने निर्णायक १९वे षटक टाकताना सामन्याचे चित्रच पालटले. या षटकातील पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर अनुक्रमे हनुमा विहारी, प्रवीण कुमार आणि डेल स्टेन यांना बाद करीत मलिंगाने हैदराबादला ८ बाद १३७ धावांवर रोखून मुंबईच्या विजयावर शिक्का मारला. वानखेडेवर कल्लाया सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची संघमालकीण नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्सच्या ‘एज्युकेशन फॉर आॅल’ या उपक्रम अंतर्गत जवळपास १७ हजार शालेय विद्यार्थ्यांना निमंत्रित केले होते. संपुर्ण सामन्यात मुंबईच्या प्रत्येक चौकार - षटकारावर बच्चेकंपनीने संपुर्ण स्टेडियम दणाणून सोडले. शिवाय सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने मैदानावर फेरी मारताना मुलांचा उत्साह आणखी वाढवला. यावेळी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला तो अर्थातच सचिन तेंडुलकर. त्यामुळे या चिमुकल्यांनी आपल्या लाडक्या सचिनचा जयघोष करीत एकच कल्ला केला.मुबंई इंडियन्स : लेंडल सिमन्स त्रि. गो. स्टेन ५१, पार्थिव पटेल झे. विहारी गो. स्टेन १७, उन्मुक्त चंद झे धवन गो. प्रवीण कुमार ५, रोहित शर्मा झे. भुवनेश्वर कुमार गो. शर्मा २४, किरॉन पोलार्ड त्रि. गो. भुवनेश्वर कुमार ३३, अंबाती रायुडू झे. बोल्ट गो. भुवनेश्वर कुमार ७, हरभजन सिंग झे. भुवनेश्वर कुमार गो. प्रवीण कुमार ०, जगदीश सुचित नाबाद ९, विनय कुमार झे. ओझा गो. भुवनेश्वर कुमार ०, मिचेल मैक्लनघन नाबाद १; अवांतर : १०; एकूण : ८ बाद १५७; गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट ४-०-२७-०, भुवनेश्वर कुमार ४-०-२६-३, डेल स्टेन ४-०-३८-२, प्रवीण कुमार ४-०-३५-२, कर्ण शर्मा ४-०-३०-१. सनराझर्स हैदराबाद : शिखर धवन घे. मलिंगा गो. मॅक्लेनगन ४२, डेव्हिड वॉर्नर झे. रायडू गो. मलिंगा ९, लेकेश राहुल झे. रायडू गो. मॅक्लेनगन २५, नमन ओझा झे. पोलार्ड गो. सुचित ९, रवी बोपारा झे. पांड्या (बदली खेळाडू) गो. मॅक्लेनगन २३, हनुमा विहारी झे. पटेल गो. मलिंगा १६, कर्ण शर्मा नाबाद २, प्रवीण कुमार त्रि. गो. मलिंगा ०, डेल स्टेन झे. पोलार्ड गो. मलिंगा ०, भुवनेश्वर कुमार नाबाद ६; अवांतर : ५; एकूण : ८ बाद १३७; गोलंदाजी : हरभजनसिंग ४-०-३६-०, मिचेल मॅक्लेनगन ४-०-२०-३, लसिथ मलिंगा ४-१-२३-४, जगदीश सुचित ४-०-२५-१, विनयकुमार ४-०-३१-०.वानखेडेवर पाण्याचा वर्षावमुंबई : सामना संपल्यानंतर उपस्थित मुलांनी चांगलाच गोंधळ माजवला. प्रेस बॉक्सच्या वरच्या स्टॅण्ड मधील मुलांनी सामना संपल्यानंतर अचानकपणे पाण्याने भरलेले प्लास्टीक ग्लास फेकण्यास सुरुवात केली. पाहता पाहता इतर मुलांनी देखील स्टॅण्ड वरुन मैदानात पाण्याने भरलेल्या प्लास्टीक ग्लासचा वर्षाव सुरु केला. यावेळी खालच्या बाजूला उभे असलेल्या फोटोग्राफर्सला चांगलाच त्रास झाला. शिवाय हैदराबदच्या तीन चीअर लीडर्सना तर पाण्याचा मारा चुकवण्यासाठी स्पीकरचा आधार घ्यावा लागला. जवळ-जवळ १-२ मिनिटे सुरु असलेला हा प्रकार पाण्याचे ग्लास संपल्यानंतच थांबला. यावेळी मुंबई इंडियन्सच्या स्वयंसेवकांनी मुलांना रोखण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र या ‘चिल्लर पार्टी’ समोर त्यांचे काहीही चालले नाही. त्यात कहर म्हणजे ज्यावेळी मुंबई संघ मैदानावर फेरी मारत असताना देखील एका टारगट मुलाने एक ग्लास खेळाडूंच्या दिशेने भिरकवलाच.