शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पराभव टाळण्यासाठी यजमानांचा संघर्ष

By admin | Updated: August 1, 2015 00:30 IST

सलामीवीर अभिनव मुकुंद (५९), भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली (४५) आणि श्रेयस अय्यर (४९) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर भारत ‘अ’ संघ आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध अनौपचारिक

चेन्नई : सलामीवीर अभिनव मुकुंद (५९), भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली (४५) आणि श्रेयस अय्यर (४९) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर भारत ‘अ’ संघ आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध अनौपचारिक कसोटी सामन्यात पराभव टाळण्यासाठी संघर्ष करीत आहे. पहिल्या डावात २१४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारत ‘अ’ संघाने आज तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ६ बाद २६५ धावांची मजल मारली. भारत ‘अ’ संघाकडे आता ५१ धावांच्या आघाडी असून चार विकेट शिल्लक आहेत.त्याआधी, कालच्या ९ बाद ३२९ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पहिला डाव ३४९ धावांत संपुष्टात आला. भारत ‘अ’ संघातर्फे बाबा अपराजितने ८६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले आणि कसोटी संघात स्थान न मिळालेला डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने १०७ धावांत ४ फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या भारत ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार चेतेश्वर पुजारा (११) स्टिव्हन ओकिफेच्या थेट थ्रोवर धावचित झाला. पुजाराने २७ चेंडूंना सामोरे जाताना १ चौकार लगावला. त्यानंतर मुकुंद, विराट, करुण नायर आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली फलंदाजी करीत संघाचा डाव सावरला. मुकुंदने १६३ चेंडूंना सामोेरे जाताना ५९ धावा फटकावल्या. त्यात ३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. विराटने ४५ धावांची खेळी पाच चाौकार व १ षटकाराने सजवली. नायरने ३४ चेंडूंमध्ये आक्रमक ३१ धावा फटकावताना ७ चौकार ठोकले. श्रेयस अय्यरने ८ चौकारांच्या सहाय्याने ४९ धावा फटकावल्या. मुकुंद व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. विराटला ओकिफेने क्लीनबोल्ड करीत भारत ‘अ’ संघाला दुसरा धक्का दिला. मुकुंदने नायरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. नायरला गुरिंदर संधूने माघारी परतवले. मुकुंद व अय्यर यांनी चौथ्या विकेटासठी ६९ धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणाऱ्या मुकुंदला एश्टन एगरने बाद केले. यजमान संघाने २०३ धावसंख्या असताना चौथी विकेट गमावली. मुकुंद बाद झाल्यानंतर ६ धावांच्या अंतरात अय्यरही माघारी परतला. त्याला ओकिफेने बाद केले. नमन ओझा (३०) आणि अपराजित (नाबद २८) यांनी सहाव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळातील काही षटके शिल्लक असताना ओकिफेने ओझाला तंबूचा मार्ग दाखवला. ओझाने ४४ चेंडूंमध्ये ३० धावा फटकावल्या. त्यात ३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक भारत-अ पहिला डाव १३५; आॅस्ट्रेलिया-अ पहिला डाव ३४९; भारत-अ दुसरा डाव : ८३ षटकांत ६ बाद २६७; (अभिनव मुकुंद ५९, श्रेयस अय्यर ४९, विराट कोहली ४५, करुण नायर ३१, नमन ओझा ३0, बाबा अपराजित खेळत आहे २८, चेतेश्वर पुजारा ११, श्रेयस गोपाल खेळत आहे 0, स्टीव्ह ओकीफे ३/८३, गुरिंदर संधू १/७४, एशटन एगर १/७१).