शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

हॉग

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

भारताकडे जेतेपद राखण्यालायक गोलंदाज नाहीत : रॉडनी हॉगमेलबोर्न : भारताकडे विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्यालायक गोलंदाजी आक्रमण नाही. भारतीय संघात उमेश यादवचा अपवाद वगळता एकही प्रभावी गोलंदाज नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रॉडनी हॉगने व्यक्त केले. कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळताना ८५ बळी घेणारा ६३ वर्षीय हॉग म्हणाला, 'भारताचा ...


भारताकडे जेतेपद राखण्यालायक गोलंदाज नाहीत : रॉडनी हॉग
मेलबोर्न : भारताकडे विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्यालायक गोलंदाजी आक्रमण नाही. भारतीय संघात उमेश यादवचा अपवाद वगळता एकही प्रभावी गोलंदाज नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रॉडनी हॉगने व्यक्त केले.
कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळताना ८५ बळी घेणारा ६३ वर्षीय हॉग म्हणाला, 'भारताचा वेगवान मारा प्रभावित करणारा नाही. अशा प्रकारच्या मार्‍याच्या जोरावर जेतेपद राखणे शक्य होणार नाही. विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकाविण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला माझी पसंती आहे. दक्षिण आफ्रिका संघात जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज डेल स्टेन असून सर्वोत्तम फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा समावेश आहे.'
हॉग म्हणाला, 'स्टेन किंवा जॉन्सन यांच्याप्रमाणे वेगवान मारा करण्याची क्षमता असलेला वेगवान गोलंदाज भारतीय संघात नाही. उजव्या यष्टीबाहेर मारा करण्याची रणनीती उपयुक्त सिद्ध होईल, असे वाटत नाही. मोहम्मद शमी व मोहीत शर्मा यांच्यासारखे गोलंदाज न्यूझीलंडमधील खेळप˜्यावर यशस्वी ठरू शकतात. भारतीय संघात मध्यमगती गोलंदाज आहेत, पण ते ऑस्ट्रेलियन खेळप˜्यांवर उपयुक्त ठरू शकत नाही. रविचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जडेजा ॲडलेडमध्ये यशस्वी ठरू शकतात.'
हॉग म्हणाला, 'भारतीय गोलंदाजांमध्ये यादव मला अधिक आवडतो. तो आपल्या वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतो, पण त्यासाठी त्याने अचूक टप्पा व दिशा राखून गोलंदाजी करणे आवश्यक आहे. यादवमध्ये वेगवान मारा करण्याची क्षमता आहे.'
किम ‘ूजच्या नेतृत्वाखाली १९७९ मध्ये भारताचा दौरा करणारा व्हिक्टोरियाचा हा वेगवान गोलंदाज म्हणाला, 'टप्पा व दिशा यावर नियंत्रण मिळविल्यानंतर यादवने आऊटस्विंगर व इनस्विंग यॉर्कर करण्याचा प्रयत्न करावा. जर त्याला स्विंग गोलंदाज म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर त्याने वेगवान मारा करण्याचा विचार सोडावा आणि कपिलदेवप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायला हवा.'
हॉगने या वेळी भारताचे माजी कर्णधार कपिलदेव व सुनील गावस्कर यांची प्रशंसा केली. हॉग म्हणाला, 'आमच्या काळात कपिलदेव स्विंग मारा करण्यात वाक बगार गोलंदाज होता. टप्पा व दिशा यावर त्याचे नियंत्रण होते. भारतीय फलंदाजांमध्ये मला सुनील गावस्करला बाद करण्यात कधीच यश आले नाही. त्याचे तंत्र सर्वोत्तम होते. विश्वनाथ चांगला फलंदाज होता. चेतन चौहानचे बचावतंत्र उत्तम होते.'
(वृत्तसंस्था)
०००००