शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

३६ वर्षांनंतर इतिहास रचण्यास हॉकी संघ सज्ज

By admin | Updated: August 4, 2016 20:25 IST

भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ ३६ वर्षांनंतर रिओ आॅलिम्पिकमध्ये नवीन इतिहास रचण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवणार आहे.

ऑनलाइन लोकमतरियो डी जेनेरो, दि. ४ : भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ ३६ वर्षांनंतर रिओ आॅलिम्पिकमध्ये नवीन इतिहास रचण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवणार आहे. पुरुष संघाने याआधीचे आॅलिम्पिक पदक १९८0 मॉस्को आॅलिम्पिकमध्ये जिंकले होते. तसेच महिला हॉकी संघही अखेरच्या वेळी आॅलिम्पिकमध्ये मॉस्को येथेच खेळला होता.

रियोत भारताची सलामीची लढत शनिवारी आयर्लंड संघाविरुद्ध होणार आहे. जूनमध्ये स्पेनमध्ये झालेल्या सहा देशांच्या स्पर्धेत आयर्लंडवरील मिळालेल्या विजयाने भारताचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. संघाचा कर्णधार पी.आर. श्रीजेशने म्हटले, ह्यआयर्लंडच्या खेळाडूंनी युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यांच्याविषयी आधीच अंदाज लावणे कठीण आहे. मैदानात चेंडूंवर त्यांची पकड मजबूत आहे. ही लढत सोपी नसून आम्हाला सर्वस्व पणाला लावण्याची आवश्यकता आहे. खेळाच्या या महाकुंभात मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल याविषयी मला कधीही आशा नव्हती. माझे उद्दिष्ट आपल्या देशासाठी पदक जिंकून ३६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचा आहे.

श्रीजेश म्हणाला, ह्यमाझे पहिले काम हे गोल वाचवणे आहे आणि दुसरे काम संघाला एकजूट करून चांगले खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे. तिसरे काम हे एक गोलरक्षक म्हणून संघात आत्मविश्वास निर्माण करणे हे आहे. हे तिन्ही काम एक कर्णधार करू शकतो, असे मला वाटते आणि त्यामुळे माझ्यावर याचे कोणतेही अतिरिक्त दडपण नाही. सर्वच खेळाडूंना दबावाशिवाय आपला स्वाभाविक खेळ करण्याची आवश्यकता आहे.ह्ण

२000 मध्ये सिडनीत अर्जेंटिनाला ३-0 असे नमवल्यानंतर भारताने आतापर्यंत आॅलिम्पिकचा सलामीचा सामना जिंकला नाही. संघाला २00४ मध्ये अ‍ॅथेन्स आॅलिम्पिक आणि २0१२ च्या लंडन आॅलम्पिकमध्ये हॉलंडकडून अनुक्रमे १-३ आणि २-३ असा पराभव पत्करावा लागला होता.

जागतिक क्रमवारीतल पाचव्या क्रमांकावरील भारतीय संघाचे लक्ष्य हे ३६ वर्षांनंतर आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे असणार आहे. दुसरीकडे १९0८ नंतर प्रथमच आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या आयर्लंडचा संघ ही लढत जिंकून आपले पुनरागमन संस्मरणीय करण्याच्या निर्धाराने खेळेल. भारतीय संघाची व्यूहरचना आयर्लंडचा मार्की खेळाडू मिश डार्लिंगसह गोलरक्षक आणि कर्णधार डेव्हिड हार्टे यांच्यावर प्रामुख्याने केंद्रित असेल.

दुसरीकडे १९८0 नंतर आॅलिम्पिकमध्ये प्रथमच सहभागी होणाऱ्या भारतीय महिला संघाची लढत रविवारी जपानविरुद्ध होणार आहे. गेल्या वर्षी भारताने विश्व हॉकी लीगमध्ये जपानला पराभवाची चव चाखावी लावली होती. त्यामुळे भारतीय संघ अनुभवी डिफेंडर सुशीला चानू हिच्या नेतृत्वाखाली आत्मविश्वासाने मैदानात पाऊल ठेवेल.

जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असणाऱ्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक नील हॉवगूड म्हणाले, संघातील खेळाडू आपल्या पहिल्या आॅलिम्पिक स्पर्धेविषयी उत्साहित आहेत. अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती आणि तेथे आम्ही काही सामनेदेखील जिंकले. तेथील कामगिरीमुळे मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही आॅलिम्पिकमध्ये कामगिरी उंचावण्याचा पूर्ण प्रयत्न करू.ह्णसंघाची कर्णधार सुशीला चानू हिने म्हटले, ह्यही आमची पहिली आॅलिम्पिक स्पर्धा आहे आणि आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू इच्छितो. जपानविरुद्ध आम्ही याआधीही चांगली कामगिरी केली आणि येथेदेखील यश आम्हालाच मिळेल. प्रशिक्षकांशी विचार विनिमियाद्वारे निश्चित झालेल्या व्यूहरचनेनुसार आम्ही कामगिरी करू.