ऑनलाइन लोकमत
मलेशिया, दि. 26 : चीनचा 9-0 अशा फरकाने धुव्वा उडवित एशियन चॅम्पियनशिप चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या भारतीय संघाने आज आक्रमक व अफलातून खेळाचे प्रदर्शन करीत मलेशिया संघाचा 2-1 गोलने पराभव केला. भारताकडून रुपेंद्रपाल सिंगने दोन केले. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा चौथा विजय असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत.
कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. भारताकडून 22व्या मिनिटाला रूपेंद्र पालने पॅनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाचे खाते उघडले. मलेशियाच्या संघाने आक्रमक खेळ करत भारताचे वर्चस्व मोडीत काढले. रझाय रहीमने गोल करत भारताची आघाडी मोडत काधली आणि सामन्यात बरोबरी मिळवली. रझाय रहीमच्या गोलमुळे सामन्यात चुरस निर्माण झाली. पहिल्या हाफ 1-1 अशा बरोबरीत सुटला.
भारताने दुसऱ्या हाफमध्ये शानदार खेळी करत मलेशिया संघाची हवा काढून टाकली. दुसऱ्या हाफमध्ये भारताकडून रुपेंद्रपाल सिंगने पहिला गोल करत सामन्यात 2-1 ने आघाडी घेतली. भारताकडून रुपेंद्रपाल सिंगने उत्कृष्ट खेळी केली.
भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा चौथा विजय आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या लढतीत जपानला १०-२ गोलने नमविले होते. कोरियाविरुद्ध त्यांना १-१ गोल बरोबरीत समाधान मानावे लागले. तर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकचा 3-2 ने धुव्वा उडवला होता. काल काल झालेल्या सामन्यात चीनचा 9-0 ने धुव्वा उडवला होता.