शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

हॉकी इंडियातर्फे ३५ संभाव्य खेळाडूंची घोषणा; १३ ज्युनियर्सना संधी, आशिया चषकासाठी संघ निवडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:04 IST

हॉकी इंडियाने आज शनिवारपासून साई केंद्रात सुरू होत असलेल्या ४० दिवसांच्या तयारी शिबिरासाठी संभाव्य ३५ जणांची नावे जाहीर केली. त्यात ज्युनियर विश्वचषक विजेत्या १३ जणांचा समावेश करण्यात आला.

बेंगळुरु : हॉकी इंडियाने आज शनिवारपासून साई केंद्रात सुरू होत असलेल्या ४० दिवसांच्या तयारी शिबिरासाठी संभाव्य ३५ जणांची नावे जाहीर केली. त्यात ज्युनियर विश्वचषक विजेत्या १३ जणांचा समावेश करण्यात आला. भारतीय वरिष्ठ संघ ढाका येथे होणाºया हिरो आशिया चषकात सहभागी होणार असून स्पर्धेला ४५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.ज्युनियर विश्वविजेत्या संघाचा गोलकिपर विकास दहिया, बचावफळीतील दिप्सन तिर्की, हरमनप्रीतसिंग, गुरिंदरसिंग, वरुण कुमार, मिडफिल्डर हरजीतसिंग, मनप्रीत ज्युनियर, निलकांता शर्मा आणि सुमित, आक्रमक फळीतील मनदीपसिंग, गुरजंतसिंग, सिमरनजितसिंग आणि अरमान कुरेशी तसेच गोलकिपर सूरज करकेरा यांना शिबिरासाठी पाचारण करण्यात आले. भारताने युरोप दौºयात सलग दोन सामन्यात नेदरलॅन्डला नमविले. नंतर आॅस्ट्रियावर देखील विजय साजरा केला. पाच सामन्यांच्या युरोप दौºयात सहा खेळाडूंनी सिनियर संघात पदार्पण केले. वरुण गुरजंत आणि अरमान यांनी तर पहिला आंतरराष्टÑीय गोल देखील नोंदविला.शिबिरात युवा खेळाडूंसोबतच अनुभवी सरदारसिंग, एस.व्ही. सुनील, कोथाजितसिंग, चिंगलेनसनासिंग, एस.के. उथप्पा, रमणदीपसिंग, आकाशदीपसिंग यांचाही समावेश करण्यात आला. युरोप दौºयात संघाची धुरा सांभाळणारा मनप्रीत म्हणाला,‘नव्या चेहºयांनी युरोप दौºयात शानदार कामगिरी केल्यामुळे आमच्याकडे खेळाडूंचा पूल मोठा झाला. आशिया चषक जिंकायचाच, यात दुमत नाही. त्याआधी आमच्या उणिवा दूर करण्यासाठी हे शिबिर आहे.’ (वृत्तसंस्था)संभाव्य भारतीय हॉकीपटूगोलकीपर : आकाश चिकटे, पी. आर. श्रीजेश, विकास दहिया, सूरज करकेरा . बचावफळी: दिप्सन टिर्की, प्रदीप मोर, वीरेंद्र लाकरा, कोथाजीतसिंग, सुरेंदर कुमार, रूपिंदर पालसिंग, हरमनप्रीत सिंग, जसजीत सिंग कुलार, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास, वरुण कुमार. मधली फळी: चिंगलेनसना सिंग, एस. के. उथप्पा, सुमीत, सतबीरसिंग, सरदारसिंग, मनप्रीतसिंग, हरजीतसिंग, नीलकांता शर्मा, मनप्रीत ज्युनियर, सिमरनजीतसिंग. आक्रमक फळी: रमणदीपसिंग, एस. वी सुनील, तलविंदरसिंग, मनदीपसिंग, अफ्फान युसूफ, नितीन थिमय्या, गुरजंत सिंग,आकाशदीप सिंग, ललित उपाध्याय व अरमान कुरेशी.